G20 Conference : परिषदेच्या तयारीला वेग; नेत्र विमानाच्या माध्यमातून दिल्लीच्या हवाई क्षेत्रावर नजर

बालाकोट हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी F-16 चे निरीक्षण केले होते

198
G20 Conference : परिषदेच्या तयारीला वेग; नेत्र विमानाच्या माध्यमातून दिल्लीच्या हवाई क्षेत्रावर नजर

जी-20 शिखर परिषदेसाठी (G20 Conference) राजधानी दिल्ली (Delhi) सज्ज झाली आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये सध्या जी-20 शिखर परिषदेचा उत्साह पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत बैठकीला येणाऱ्या देशांच्या प्रमुख पाहुण्यांचा मुक्काम कोणत्या हॉटेलमध्ये असणार, त्यांच्या स्वागतासाठी काय व्यवस्था आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान, परिषदेच्या सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

येत्या 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या (G20 Conference) शिखर परिषदेत 19 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ब्रिटन आणि जपानच्या पंतप्रधानांसह अमेरिका आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षही यात सहभागी होणार आहेत. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी भारताकडून सर्वोत्तम सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर (G20 Conference) भारतीय हवाई दल दिल्लीतील हवाई क्षेत्राच्या सुरक्षेसाठी स्वदेशी टेहळणी आणि देखरेख करणारे विमान ‘नेत्र’ तैनात करण्याची तयारी करत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट हल्ल्याच्या वेळी हवाई दलाचे हे विमानही चर्चेत होते. त्यानंतर ते पाकिस्तानी F-16 लढाऊ विमानांवर नजर ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते.

(हेही वाचा – National Teacher Award : येत्या ५ सप्टेंबर रोजी ७५ निवडक शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात येणार)

दिल्लीच्या हवाई संरक्षणासाठी (G20 Conference) क्षेपणास्त्रेही तैनात करण्यात येणार आहेत. लष्कराचे हेलिकॉप्टर हवाई गस्त करणार आहेत. यामध्ये एनएसजी कमांडो राहणार आहेत. स्थळाच्या आजूबाजूच्या मोठ्या आणि उंच इमारतींवर लष्कर आणि NSG स्नायपर तैनात केले जातील. पहिल्यांदाच अॅन्टी-ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे, म्हणजेच यादरम्यान पतंगही उडणार नाहीत.

देशात पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्याने सुरक्षा

समिटच्या सुरक्षेसाठी (G20 Conference) दिल्लीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित कॅमेरेही तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास हे कॅमेरे तात्काळ सुरक्षा अधिकाऱ्याला अलर्ट संदेश पाठवतील. ज्या ठिकाणी परदेशी पाहुणे मुक्काम करतील, तेथे ड्रोनविरोधी यंत्रणा आणि बुलेटप्रूफ चष्मे बसवण्यात आले आहेत. त्याच वेळी, आयटी तज्ञांची टीम समिट दरम्यान सोशल मीडिया पोस्ट आणि ट्रेंडवर लक्ष ठेवेल.

परिषदेसाठी 900 CRPF जवान तैनात

​​​​​​​G-20 शिखर परिषदेच्या (G20 Conference) पाहुण्यांना सुरक्षा देण्यासाठी या चालकांसह एकूण 900 CRPF जवान तैनात करण्यात आले आहेत. यातील काही जवानांनी यापूर्वी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्येही काम केले आहे.

परदेशी पाहुण्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र सीमा बल कमांडो तैनात करण्यात आले आहेत. इतर केंद्रीय सशस्त्र दल जसे की इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि NSG च्या ब्लॅक कॅट कमांडोना मार्ग आणि स्थळाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी ते दिल्ली पोलिसांशी समन्वय साधतील.

परदेशी पाहुण्यांच्या पंक्तीला भारतीय स्ट्रीट फूड आणि धान्ये

G20 शिखर (G20 Conference) परिषदेसाठी येणाऱ्या जागतिक नेत्यांना मिलेटस् आणि चांदणी चौकातील खास पदार्थांव्यतिरिक्त स्ट्रीट फूड दिले जाईल. G20 इंडियाचे विशेष सचिव मुक्तेश परदेशी यांच्या म्हणण्यानुसार, या शिखर परिषदेसाठी 10,000 हून अधिक लोक दिल्लीला भेट देतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी मेनूला अंतिम टच देण्यासाठी शेफ ओव्हरटाईम करत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.