Swimming Pool In Andheri : अंधेरीकरांसाठी आणखी एक स्विमिंग पूल : रविवारी झाले लोकार्पण

228
Swimming Pool In Andheri : अंधेरीकरांसाठी आणखी एक स्विमिंग पूल : रविवारी झाले लोकार्पण
Swimming Pool In Andheri : अंधेरीकरांसाठी आणखी एक स्विमिंग पूल : रविवारी झाले लोकार्पण

अंधेरीवासियांसाठी दुसरा एक जलतरण तलाव उपलब्ध (Swimming Pool In Andheri) झाला असून अंधेरी (पश्चिम) मधील गिलबर्ट हिल येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचे लोकार्पण उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडले. मुंबई महापालिकेचे हे दहावे जलतरण तलाव असून या तलावात आहे. या तलावाच्या सदस्य नोंदणीसाठी रविवारपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये २७५० सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने सदस्यत्वाची नोंदणी करता येणार आहे.

(हेही वाचा – Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; कारवाईला सुरुवात)

गिलबर्ट हिल येथे महानगरपालिकेतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी, ३ सप्टेंबर २०२३ या दिवशी संपन्न झाले. या सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, आमदार राजहंस सिंह, महानगरपालिकेचे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, के. पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान आणि विविध मान्यवर उपस्थित होते. (Swimming Pool In Andheri)

New Project 64

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री लोढा यांनी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद काम करताना आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव विकसित केल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. अंधेरी परिसरातील नागरिकांसाठी अतिशय उत्तम दर्जाची सुविधा या जलतरण तलावाच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मोकळ्या जागेत या ठिकाणी व्यायामशाळेचीही उभारणी करावी, तसेच जलतरण तलावाच्या सभासद नोंदणी महिला वर्गाला अधिकाधिक प्राधान्य मिळावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुंबईतील झोपडीवासियांच्या परिसरांमध्ये प्रसाधनगृहासारख्या मूलभूत सुविधांपासून ते दैनंदिन दगदगीतून विसावा मिळण्यासाठी मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुंबईकरांच्या सेवेत आणखी तीन तलाव

मुंबईतील दहावा जलतरण तलाव अंधेरीतील गिल्बर्ट हिल जलतरण तलावाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. आता अंधेरीवासीयांसाठी दोन जलतरण तलाव उपलब्ध झाले आहेत. येत्या महिन्याभराच्या कालावधीत वरळी, विक्रोळी आणि अंधेरी पूर्व (कोंडीविटा) येथे जलतरण तलावाचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर काही दिवसातच नागरिकांना त्या ठिकाणी देखील सदस्य नोंदणी ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी संबोधित करताना दिली. (Swimming Pool In Andheri)

गिल्बर्ट हिल जलतरण तलाव नोंदणी सुविधा
  • वेळ- सकाळी ६ ते रात्री १०
  • वार्षिक शुल्क (सर्वसाधारण)– ८ हजार ४१० रूपये
  • महिलांसाठी (२५ टक्के सवलत)– ६ हजार ३९० रूपये
  • १५ वर्षाखालील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग– ४ हजार ३७० रूपये
  • कालावधी- एका वर्षासाठी २ हजार ७५० जणांना सभासदत्व दिले जाणार आहे.

नोंदणी कुठे कराल ?

सभासदत्वासाठी ३ सप्टेंबर २०२३ रोजी ११ वाजेपासून पासून https://swimmingpool.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी खुली करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण होवून नंतर सभासदांसाठी हा जलतरण तलाव दिनांक १ ऑक्टोबर २०२३ पासून खुला होईल. (Swimming Pool In Andheri)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.