पाकिस्तान विरुद्धचा सामना (IND vs NEP) पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ सोमवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा सामना करेल. त्या वेळी भारताचे लक्ष्य मोठय़ा विजयासह ‘सुपर फोर’ फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याचे असेल.
अशातच नेपाळविरुद्धच्या (IND vs NEP) सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह मायदेशी परतल्याने आता बुमराहच्या जागी संघात शमीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. नेपाळविरुद्ध सामना जिंकणं काही अवघड नाही. पण आज होणाऱ्या सामन्यामध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – IND vs PAK Hockey 5s Match : आशिया कपमध्ये पाकिस्तानला नमवत भारत विजयी; पंतप्रधान मोदींनी केले संघाचे अभिनंदन)
श्रीलंकेतील हवामान खूपच खराब दिसतंय. सोमवारी (४ सप्टेंबर) पल्लेकेलेमध्ये पावसाची शक्यता ८९ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर (IND vs NEP) आजचाही सामना पावसामुळे रद्द झाला तर? हा प्रश्न क्रिकेट प्रेमींना सतावत आहे. पण जर सामना रद्द झाला तर भारत आणि नेपाळला १-१ असे समान गुण मिळतील आणि भारतीय संघ सुपर-४ साठी पात्र ठरेल.
नेपाळविरुद्धचा सामना (IND vs NEP) जिंकून पाकिस्तान संघाने सुपर ४ मध्ये प्रेवश केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community