Mumbai Darshan : बेस्टकडून पर्यटकांना होणारे ‘मुंबई दर्शन’बंद, ओपन डेक डबलडेकर बस ऑक्टोबरपासून सेवेतून हद्दपार

50 नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढलेली नविदाही रद्द

198
Mumbai Darshan : बेस्टकडून पर्यटकांना होणारे 'मुंबई दर्शन'बंद, ओपन डेक डबलडेकर बस ऑक्टोबरपासून सेवेतून हद्दपार
Mumbai Darshan : बेस्टकडून पर्यटकांना होणारे 'मुंबई दर्शन'बंद, ओपन डेक डबलडेकर बस ऑक्टोबरपासून सेवेतून हद्दपार

पर्यटनाला चालना मिळावी, मुंबईतील विविध पर्यटन स्थळे पर्यटकांना सोयीस्कररीत्या पाहता यावीत आणि उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बेस्टने सुरू केलेली तसेच पर्यटकांचे खास आकर्षण असलेली ओपन डेक डबलडेकर बस येत्या ऑक्टोबरपासून सेवेतून हद्दपार होणार आहे. बेस्ट उपक्रमाने 50 नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढलेली नविदाही रद्द केली आहे. यानंतर नवीन ओपन डेक बस चालवण्याचा बेस्ट उपक्रमाचा सध्या कोणताही विचार नाही, अशी माहिती बेस्ट एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे बेस्टच्या माध्यमातून पर्यटकांना घडणारे ‘मुंबई दर्शन’ बंद होणार आहे.

या ओपन डेक डबलडेकर बसेस पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय होता. या बसेसमधून प्रत्येक महिन्याला साधारण 20 हजार पर्यटक आनंद घेतात. बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने 26 जानेवारी 1997 रोजी नॉन एसी ओपन डेक बस सुरू केली. या बसमध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. पूर्वी ओपन डेक बसमधून मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यात येत होती. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2021पासून दक्षिण मुंबईमध्ये पर्यटकांसाठी ओपन डेक बसगाडीतून पर्यटनसेवेचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी आणि दुपारी सुरू असलेल्या या सेवेच्या वेळेत वाढलेल्या उकाड्यामुळे बदल करण्यात आला. त्यानंतर बसच्या फेऱ्या सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत होऊ लागल्या. त्यानंतर आता शेवटची ओपन डेक डबलडेकर बस 15 सप्टेंबर 2023 रोजी सेवेतून हद्दपार होणार आहे.

(हेही वाचा – Narayan Rane: मराठा समाजाला न्याय द्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मागणी)

बसचे आयुर्मान संपले

पर्यटकांना मुंबई दर्शन घडवणाऱ्या या ओपन डेक डबलडेकर बसेसचे आयुर्मान संपल्यामुळे या बसेस सेवेतून हद्दपार होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात 3 ओपन डेक बस असून 16 सप्टेंबरला पहिली बस सेवेतून काढण्यात येईल. त्यानंतर 25 सप्टेंबरला दुसरी आणि 5 ऑक्टोबरला शेवटची बस सेवेतून बाद केली जाणार असल्याची माहिती बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.