चंद्रयान-३ (Chandrayan – 3 ) च्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रचंड कौतुक होत आहे. सध्या प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये असले तरी विक्रम लँडर पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. असे इस्रोने सोमवारी ट्विट करून माहिती दिली. इस्रोने सांगितले की लँडर ४० सेमी वर उचलले गेले आणि ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर सुरक्षितपणे लँड केले.
विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर उडी मारली. मात्र विक्रमनं पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केलं आहे. विक्रम लँडर त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या कामापेक्षा अधिक गोष्टी करत आहे. त्यानं उडी मारण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, अशी माहिती इस्रोनं दिली. इस्रोनं कमांड दिल्यानंतर विक्रमचं इंजिन सुरू झालं. त्यानंतर विक्रम रोव्हर ४० सेंटीमीटर हवेत उडालं. यानंतर त्यानं ३० ते ४० सेंटिमीटर अंतर कापत पुन्हा सॉफ्ट लँडिंग केलं. विक्रमनं केलेली कामगिरी भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. भविष्यात चंद्राच्या पृष्ठभागावरुन पुरावे आणण्यासाठी मोहीम आखली गेल्यास त्यात विक्रमनं आता केलेली कामगिरी मोलाची असेल. यावेळी रॅम्प पुन्हा उघडून बंद करण्यात आला. पुन्हा यशस्वी लँडिंग केल्यानंतर, सर्व उपकरणे पूर्वीप्रमाणे रीसेट केली गेली.
(हेही वाचा : Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, पोलिसांची ४ पथके आरोपीच्या मागावर)
इस्रोने सांगितले की, हा प्रयोग ३ सप्टेंबरला करण्यात आला. भविष्यातील ऑपरेशन्सची खात्री करणे आणि नमुना परतावा मिळण्याची नवीन आशा देणे हा त्याचा उद्देश आहे.प्रज्ञान रोव्हर आपले काम पूर्ण केले ते स्लीप मोडमध्ये सूर्योदय झाल्यानंतर सौर उर्जेच्या मदतीनं प्रज्ञान पुन्हा त्याचं काम सुरू करेल. बॅटरी देखील पूर्णपणे चार्ज आहे. रोव्हर अशा दिशेने ठेवण्यात आले आहे की जेव्हा २२ सप्टेंबर २०२३ रोजी चंद्रावर पुढील सूर्योदय होईल तेव्हा सूर्यप्रकाश सौर पॅनल्सवर पडेल. त्याचा रिसीव्हरही चालू ठेवण्यात आला आहे. २२ सप्टेंबरपासून ते पुन्हा कामाला लागण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community