Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, एकाला अटक

पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका क्लिनिंग कंपनीच्या नोकराला अटक करण्यात आली आहे.

178
Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, एकाला अटक
Powai Murder : पवईत प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या, एकाला अटक

मुंबईतील पवई येथील एका फ्लॅटमध्ये २४ वर्षीय प्रशिक्षणार्थी हवाई सुंदरीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या हवाई सुंदरीचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका क्लिनिंग कंपनीच्या नोकराला अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीने हवाई सुंदरीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला असता तीने त्याला विरोध केल्यामुळे ही हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

रुपल ओग्रे असे हत्या करण्यात आलेल्या हवाई सुंदरीचे नाव असून ती मूळची छत्तीसगड येथे राहणारी होती. एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी ती एप्रिलमध्ये मुंबईत आली होती. अंधेरीतील मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानका जवळील कृष्णलाल मारवाह मार्गावर असलेल्या एनजी कॉम्प्लेक्स मध्ये एका फ्लॅटमध्ये रुपल राहण्यास होती. सोमवारी सकाळी रुपल हीचा मृतदेह तिच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पोलिसांना मिळाला. मारेकऱ्याने रुपलचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनास्थळी दाखल झालेल्या पवई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. पवई पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ८ पोलीस पथके तयार केली होती. मृत तरुणी राहत असलेल्या सोसायटीत बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावर पोलिस लक्ष ठेवून होते. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून पोलिसांनी सोसायटीत साफसफाईचे काम करण्यासाठी येणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

(हेही वाचा – Transgender Dahihandi : दहीहंडी उत्सवात प्रथमच तृतीयपंथीय सहभागी होणार, पिंपरी-चिंचवडमध्ये चार संघ तयार)

याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून हत्येचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू असल्याचे नलावडे यांनी सांगितले. आरोपीने हा दुपारी रुपलच्या घरी आला होता व त्याने साफसफाईच्या निमित्त करून घरात प्रवेश मिळवला होता अशी माहिती समोर येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुपल ज्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत मिळाली त्या फ्लॅटमध्ये रुपल ही तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासोबत राहत होती. हे दोघेही वैयक्तिक कामानिमित्त आठ दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी गेले होते. पवई पोलिसांनी त्यांना सोमवारी सकाळी या घटनेची माहिती दिली आणि आता ते मुंबईकडे निघाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.