Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी CM आदित्यनाथ योगी भेटणार PM नरेंद्र मोदींना

CM योगी राम मंदिर लोकार्पणासाठी PM मोदी यांना निमंत्रण देणार आहेत

163
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी CM आदित्यनाथ योगी भेटणार PM नरेंद्र मोदींना
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी CM आदित्यनाथ योगी भेटणार PM नरेंद्र मोदींना

अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir)  उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी (५ सप्टेंबर) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सीएम योगी पंतप्रधानांच्या निवासस्थानी संध्याकाळी ६ वाजता येण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२४ मध्ये रामल्लाची प्रतिष्ठापना करून राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार CM योगी राम मंदिर लोकार्पणासाठी PM मोदी यांना निमंत्रण देणार आहेत अशी माहीतीही समोर येत आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पीएम मोदींनाही निमंत्रित करणार आहेत.यूपीचे प्रमुख नेते पंतप्रधानांच्या भेटीत मुख्यमंत्री योगी यांच्यासोबत येऊ शकतात. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पुढील वर्षी २१,२२ किंवा २३ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असे ट्रस्टच्या एका सदस्याने अलीकडेच सांगितले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण पाठवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमात प्रमुख साधू आणि इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत,” ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रम राजकीय नसेल. विविध राजकीय पक्षांच्या पाहुण्यांनाही आमंत्रित केले जाईल, जर त्यांचा येण्याचा मानस असेल. कार्यक्रमात कोणताही स्टेज किंवा जाहीर सभा होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा : Jalna Maratha Agitation : जालना प्रकरणात गुप्तचर यंत्रणा गाफील कशी राहिली?)

१३६ सनातन परंपरेतील २५००० हिंदू धर्मगुरु आमंत्रण
या सोहळ्यासाठी १३६ सनातन परंपरेतील २५००० हिंदू धर्मगुरूंना आमंत्रित करण्याची ट्रस्टची योजना आहे. अशा संतांची यादी मंदिर ट्रस्टने तयार केली असून लवकरच त्यांना ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या स्वाक्षरीचे निमंत्रण पत्र पाठवले जाईल, असे त्यांनी सांगितले. “ट्रस्टने अयोध्येतील मोठ्या मठांमध्ये सर्व प्रमुख संतांना सामावून घेण्याची योजना आखली आहे,” राय म्हणाले. १०,०००”विशेष पाहुणे” पासून वेगळे असतील जे रामजन्मभूमीच्या आवारात अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहतील. मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम ५ ऑगस्ट २०२० रोजी कोविड-१९मार्गदर्शक तत्त्वांमुळे अत्यंत मर्यादित प्रमाणात आयोजित करण्यात आला होता.”रामललाचे गर्भगृह पूर्णत्वाकडे आले आहे. आता जानेवारी महिन्यात ‘प्राण प्रतिष्ठा’ या भव्य कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे,” असे मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.