चेहरा धुणे हा रोजच्या दिनचर्येचा एक भाग आहे. ही एक सर्वसामान्य क्रिया वाटते, पण यावेळी होणाऱ्या चुकांमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही जणांची त्वचा कोरडी, खडबडीत किंवा तेलकट असते. चेहरा धुण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तजेलदार आणि मुलायम त्वचेसाठी जाणून घेऊया चेहरा धुण्याच्या योग्य पद्धती.
फेस वॉशची निवड
बहुतेक लोकं चेहरा धुताना कोणताही फेस वॉश वापरतात. त्यामुळे कोरडी त्वचा आणि पिंपल्स सारख्या सामान्य त्वचेच्या समस्या दिसून येतात. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य फेसवॉश वापरणे फार महत्वाचे आहे.
गरम पाण्याचा वापर
चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळावा. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होऊ लागते आणि त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. म्हणूनच चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याऐवजी सामान्य पाण्याचा वापर करा.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी CM आदित्यनाथ योगी भेटणार PM नरेंद्र मोदींना )
वेट वाइप्सचा वापर
वेट वाइप्सचा वापर अनेक जण करतात,मात्र काही वेळा यामुळे त्वचा पूर्णपणे स्वच्छ होतेच असं नाही. यामध्ये रासायनिक घटकही असतात.ज्यामुळे छिद्रांमध्ये घाण साचू शकते. याचा चेहऱ्यावरील त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेट वाइप्सचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा.
अस्वच्छ टॉवेलचा वापर
त्वचेच्या काळजीमध्ये केवळ चेहरा धुणेच नाही तर ते पुसणे देखील महत्त्वाचे आहे, कारण तुमचा टॉवेल देखील त्वचेच्या समस्यांचे कारण बनू शकतो. यामुळे बॅक्टेरिया त्वचेवर प्रवेश करू शकतात. असे होऊ नये यासाठी नेहमी स्वच्छ टॉवेल वापरा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community