G20 Summit : जाणून घ्या, कोणत्या देशाचे प्रमुख राहणार उपस्थित, कोण राहणार गैरहजर?

149

सध्या भारतात G20 Summit बैठकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र त्याच वेळी या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग हे या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. मात्र त्याच वेळी सौदी अरेबियाचे प्रिंस महंमद बिन सलमान हेदेखील या बैठकीला येणार नाहीत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी याआधीच या बैठकीला गैरहजर राहणार असल्यासंबंधी पंतप्रधान मोदी यांना कळवले आहे.

अमेरिका – अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी त्यांचा ७ ते १० सप्टेंबर या दिवशी भारत दौ-याचे नियोजन करण्यात आले आहे.

ब्रिटन – ब्रिटेनचे पंतप्रधान रूषी सुनक हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भारत दौ-यात सुनक यांची पंतप्रधान मोदी यांच्यासोबत स्वतंत्र बैठक नियोजित आहे.

(हेही वाचा Bharat Mandapam : G 20 साठी ‘भारत मंडपम’ सज्ज; जाणून घ्या काय आहे तयारी…)

चीन – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग हे या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. ते त्यावेळी चीनमध्ये होणा-या कार्यक्रमाला उपस्थिर राहणार आहेत. जिंगपींग पहिल्यांदा G20 Summit बैठकीला अनुपस्थित राहत आहेत.

दक्षिण कोरिया – दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यु सु येओल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

फ्रान्स – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यनुल मॅक्रोन हे या बैठकीला उपस्थिर राहणार आहेत.

कॅनडा – कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ हेही G20 Summit बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आॅस्ट्रेलिया – आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्टोनी एल्बेन्स ९ ते १० सप्टेंबर या दरम्यान होणा-या बैठकीला उपस्थिर राहणार आहेत.

बांगलादेश – बांगलादेशाचे पंतप्रधान शेख हसीना उपस्थित राहणार आहे.

रशिया – रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी स्वत: भारताचे पंतप्रधान मोदी यांना फोन करून ते या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे कळवले आहे.

सौदी अरेबिया, द. आफ्रिका, तुर्की, मेक्सिको, जपान, इटली, जर्मनी, इनडोनेशिया, ब्राझिल आणि अर्जेंटेनिया या देशांच्या प्रमुखांनी अद्याप ते G20 Summit बैठकीत उपस्थित राहणार का, याविषयी सुस्पष्टता केली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.