महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेवर वैद्यकीय विद्याशाखेतून डॉ. सचिन मुंबरे, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेतून डॉ. मिलिंद आवारे आणि होमिओपॅथी विद्याशाखेतून डॉ. राजकुमार पाटील यांची निवड झाली आहे. विद्यापरिषदेतून मा. व्यवस्थापन परिषदेवर निवड झालेल्या सदस्यांचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी अभिनंदन केले आहे. याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठ निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमानुसार मा. व्यवस्थापन परिषदेकरीता विद्यापरिषदेतून तीन सदस्यांची निवड होणे अनिवार्य आहे.
या अनुषंगाने वैद्यकीय विद्याशाखेतून डॉ. सचिन मुंबरे तसेच आयुर्वेद व युनानी विद्याशाखेतून डॉ. मिलिंद आवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. होमिओपॅथी विद्याशाखेकरीता डॉ. अजित फुंदे व डॉ. राजकुमार पाटील या दोन उमेदवाराचे अर्ज विद्यापीठास प्राप्त झाले होते. होमिओपॅथी विद्याशाखेचा सदस्य निवडीकरीता विद्यापरिषद बैठकीत विहित निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. बैठकीस उपस्थित मा. विद्यापरिषद सदस्यांनी मतदान केले. या मतदानाची मतमोजणी सभागृहात तात्काळ करण्यात आली. या मतदानात कोल्हापूरचे डॉ. राजकुमार एस. पाटील यांची होमिओपॅथी विद्याशाखेचे सदस्य म्हणून विद्यापीठाच्या मा. व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून निवड झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर अनुषंगाने तत्सम विद्याशाखेच्या शिक्षकांतून मा. कुलगुरु यांनी पुण्याच्या डॉ. सुलेखा राजेश यांची विद्यापरिषदेवर सदस्य स्विकृत म्हणून निवड केली आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation: कुणबी दाखल्यासाठी समितीची स्थापना – मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा)
विद्यापीठाच्या मा. विद्यापरिषद बैठकीच्या प्रारंभी विद्यापीठाचे नवनियुक्त सदस्यांचे विद्यापीठ परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. या बैठकीचे सूत्रसंचालन कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी केले. या बैठकीस विद्यापरिषदेचे सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विभा हेगडे, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. वाय. प्रविण कुमार, डॉ. श्रीचक्रधर मुंगल, डॉ. राजाराम मोरे, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. श्रीरंग बिचु, डॉ. राजेश गोंधळेकर, डॉ. अरुण दोडामणी, वैद्य एम.बी. समीर, डॉ. अर्चना एस.डी., डॉ. ऋतुजा दुबे, डॉ. शेख एम. अहमद, डॉ. एम. एम. जतकर, डॉ. अजित फुंड, डॉ. आशिष भागवत, डॉ. बाळासाहेब घुले, डॉ. वाय. प्रविणकुमार, डॉ. सुनिल फुगारे, वैद्य कुलकर्णी एम.एच., डॉ. जे. आर. ठाकूर, दिलीप कदम, डॉ. उदय मोहिते, डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. मदन तोणगे, डॉ. रामचंद्र कापसे, डॉ. मोहन जोशी आदी मान्यवर सदस्य बैठकीस उपस्थित होते. या बैठकीसाठी उपकुलसचिव महेंद्र कोठावदे, डॉ. संजय नेरकर, विधी अधिकारी अॅड. संदीप कुलकर्णी, राजेंद्र नाकवे, संजय कापडणीस, रंजीता देशमुख, शैलजा देसाई, दिप्तेश केदारे कृष्णा मार्कंड, यांनी परिश्रम घेतले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community