Teachers Day : शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा दिवस विद्यार्थ्यांनो जाणुन घ्या महत्व….

पालकांनंतर फक्त शिक्षकच आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाचे असतात.

196
Teachers Day : शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा दिवस विद्यार्थ्यांनो जाणुन घ्या महत्व....
Teachers Day : शिक्षकांप्रती कृतज्ञतेचा दिवस विद्यार्थ्यांनो जाणुन घ्या महत्व....

आपल्या जीवनात शिक्षकांना खूप महत्त्व आहे. पालकांनंतर फक्त शिक्षकच आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी महत्त्वाचे असतात. शिक्षकांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तुम्हाला माहिती असेल की देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन (Teachers Day) साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

५ सप्टेंबरलाच का साजरा केला जातो शिक्षक दिन ? :

अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, याच दिवशी शिक्षक दिन का साजरा केला जातो? १८८८ मध्ये या दिवशी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तामिळनाडूच्या तिरुमणी गावात झाला. दुसरे राष्ट्रपती असण्या व्यतिरिक्त, ते पहिले उपराष्ट्रपती, तत्त्वज्ञ, भारतरत्न विभूषित, भारतीय संस्कृतीचे मार्गदर्शक आणि विद्वान शिक्षक होते. प्रत्येकाने शिक्षणासाठी वाहून घेतले पाहिजे, असे त्यांचे मत होते. यासोबतच सतत शिकण्याची प्रवृत्ती असायला हवी.

अशी झाली सुरुवात

असे म्हणतात की एकदा त्यांच्या शिष्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत डॉ.राधाकृष्णन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला आवडेल. तेव्हापासून दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला. १९६२ मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

(हेही वाचा : Zika virus : राज्यात ‘या’ जिल्ह्यात आता झिका व्हायरसचा शिरकाव)

प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखांना साजरा होतो शिक्षक दिन

 प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखांना शिक्षक दिन साजरा केला जातो. यूएस प्रमाणे तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. थायलंडमध्ये १६ जानेवारी, इराणमध्ये २ मे, तुर्कीमध्ये २४ नोव्हेंबर आणि मलेशियामध्ये १६ मे रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. आणि आपला शेजारी चीन १० सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. जागतिक शिक्षक दिन ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. तर बारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. खरे तर प्रत्येकाच्या जीवनात प्रगती करून जीवन यशस्वी करण्यात गुरूचा हातखंडा असतो.

हेही पहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.