मुख्यमंत्र्यांची समिती मंगळवारी, ४ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीला जाऊन तिथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी दिली.
अंतरवाली सराटी या ठिकाणी अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन गेले होते. आणि मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांच्याशी फोनवर त्यांनी चर्चा करून दिली. मात्र अद्यापही आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन असेच सुरु ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांची एक समिती जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहे. त्यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि आणखी काही मंत्र्याचा समावेश आहे, असे देखील अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
(हेही वाचा G20 Summit : जाणून घ्या, कोणत्या देशाचे प्रमुख राहणार उपस्थित, कोण राहणार गैरहजर?)
Join Our WhatsApp Community