कडुलिंबाच्या पानांमध्ये बरेच औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्या पानांचा औषध म्हणू वापर केला जातो. बऱ्याच ब्युटी प्रॉडक्टसमध्येही कडुलिंबाच्या पानाचा वापर होतो. ही पान त्वचा आणि केस दोन्हींसाठी उत्तम ठरतात. कडुलिंबाच्या पानांचा वापर करून तुम्ही मुरुमं, डार्क सर्कल्स हटवू शकता. तसेच याच्या वापराने कोंडाही दूर होऊ शकतो.
मुरुमं होतात ठीक
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. मुरुमं दूर करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाचा फेस वॉश आणि कडुनिंबाचा साबण वापरू शकता. कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेल्या पेस्ट वापरल्याने मुरुमांमुळे होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे त्वचेचा लालसरपणा कमी होतो. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्वचेवर लावू शकता.
डार्क सर्कल कडुनिंबामध्ये अँटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तुम्ही कडुलिंबाच्या पानांची पेस्ट त्वचेवर १० मिनिटे लावू शकता.थोड्या वेळाने ती काढून टाका. यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल. यामुळे डार्क सर्कलची समस्या दूर होईल.
(हेही वाचा : Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांसह अजित पवार, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे)
त्वचेची जळजळ
त्वचेची जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही कडुनिंबाच्या पानांचा वापर करू शकता. त्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. कडुनिंबाची पाने त्वचेचा लालसरपणा, खाज आणि सूज दूर करतात. कडुनिंबाच्या पानांच्या वापराने त्वचेचा लालसरपणा कमी होतो.
मॉयश्चरायझर
कडुनिंब हे त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. या पानांचा वापर केल्यास त्वचा हायड्रेट होते व पोषणही मिळते. कडुनिंबामध्ये फॅटी ॲसिड व व्हिटॅमिन ई असते. तसेच त्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्मही असतात. कडुनिंबाची पानं वापरल्याने आपली त्वचा मुलायम होते.
पिगमेंटेशन
पिगमेंटेशन आणि अनइव्हन स्किन टोनपासून बचाव करण्यासाठी तुम्ही कडुनिंबाचा वापर करू शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community