महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवि राजा बढे यांचे धाकटे बंधू चंद्रकांत बढे (बबन बढे) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी, दि. 4 सप्टेंबर रोजी निधन झाले. रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इयर इंडिया इंटरनॅशनलमधून ते चीफ नेव्हिगेटर म्हणून निवृत्त झाले होते. त्याआधी त्यांनी रॉयल इंडियनमध्येही नोकरी केली होती. राजा बढे (भैय्यासाहेब) यांच्याविषयी त्यांना अपार प्रेम होते. राजाभाऊंना योग्य सन्मान मिळावा यासाठी ते कायम झटत आले. त्यांचे समग्र साहित्य पुन्हा प्रकाशित करणे हे त्यांचे स्वप्न होते.राजाभाऊंच्या नावाने योग्य सन्मान व्हावा, त्यांच्या नावाने काही कलात्मक गोष्टी सुरू व्हाव्यात, अशी त्यांची फार इच्छा होती. राजाभाऊंसाठीची त्यांची तळमळ कायमच प्रेरणा देणारी आहे.
त्यांनी आयुष्यभर भरपूर प्रवास केला, अनेकांना प्रवास घडवला. दहा दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या वयाची 95 वर्षे पूर्ण केली होती. लेखन, जगभ्रमंती, प्रत्यक्ष अनुभवलेले आणि मनात साठवलेल्या अनेक विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे. लाघवी, इतरांना आपुलकीने वागवणे, मोकळ्या मनाने साऱ्यांना आपलंसं करणे ही त्यांच्या स्वभावातील काही खास गुणवैशिष्ट्ये होती.
Join Our WhatsApp Community