भारतातील 8 राष्ट्रीय पक्षांच्या (Political Parties Financial Report) घोषित मालमत्तेत 1531 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. द असोसिएशन फॉर डेमॉक्रटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालानुसार 2020-21मध्ये या पक्षांची मालमत्ता 7, 297.62 कोटी रुपये इतकी होती. त्यात 2021-22 मध्ये वाढ होऊन ती आता 8, 829.16 कोटी रुपये झाली आहे.
‘एडीआर’च्या अहवालानुसार देशातील (Political Parties Financial Report) भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माओवादी (सीपीआय-एम), तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी अशा एकूण 8 राष्ट्रीय पक्षांच्या निधीत एक वर्षात ही वाढ झाली आहे. या सर्व पक्षांच्या राखीव निधीत 1572 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये या पक्षांचा राखीव निधी 7194 कोटी रुपये होता. त्यामध्ये 2021-22 या वर्षात वाढ होऊन तो 8766 कोटी रुपये झाला.
(हेही वाचा – Jammu Kashmir : सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एक दहशतवादी ठार)
यासोबतच ‘एडीआर’च्या अहवालामध्ये (Political Parties Financial Report) राष्ट्रीय पक्षांवर असलेल्या कर्जाची माहिती देखील नमूद आहे. त्यानुसार या पक्षांवर 2020-21 या वर्षात 103.55 कोटी रुपयांचे कर्ज होते. यापैकी काँग्रेसवर 71 कोटी, भाजप 16 कोटी, सीपीआय(एम) 16 कोटी, टीएमसी 3.8 कोटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 0.73 कोटी रुपयांचे कर्ज होते. तर 2021-22 या वर्षांत या 5 पक्षांचे कर्ज कमी झाले. या काळात काँग्रेसवर 41.9 कोटी रुपये, भाजपवर 5 कोटी रुपये, सीपीआय(एम) 12 कोटी रुपये, टीएमसीवर 2.5 कोटी रुपये आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर 0.72 कोटी रुपये कर्ज असल्याचे अहवालात म्हंटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community