IND Vs NEP : भारताचा नेपाळवर १० विकेट्सने विजय; भारताचा सुपर ४ मध्ये प्रवेश

रोहित-गिलची दमदार फलंदाजी

133
IND Vs NEP : भारताचा नेपाळवर १० विकेट्सने विजय; भारताचा सुपर ४ मध्ये प्रवेश

पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारताने नेपाळविरुद्धचा (IND vs NEP) सामना १० विकेट्सने जिंकला आहे. त्यामुळे भारताचा आता सुपर ४ मध्ये प्रवेश झाला आहे.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल (IND vs NEP) यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर भारताने नेपाळचा दहा विकेट्सने पराभव केला. याही सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार भारतासमोर विजयासाठी २३ षटकात १४५ धावांचे आव्हान होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने २०.१ षटकात १४७ धावांपर्यंत मजल मारली. यावेळी रोहित शर्माने नाबाद ७४ तर शुभमन गिल याने नाबाद ६७ धावांची खेळी केली.

(हेही वाचा – Aditya L1 : आदित्यने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत केला नव्या कक्षेत प्रवेश)

रोहित शर्माने नाणफेक जिंकून नेपाळला (IND vs NEP) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. नेपाळने प्रथम फलंदाजी करत २३० धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय संघ मैदानात उतरला मात्र तीन षटकांचा खेळ होण्याआधीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळ जवळपास दोन तासांसाठी थांबला होता. पावसाने उसंत घेतल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. पाऊस पडल्यामुळे भारतीय संघाला फलंदाजी करणे कठीण जात होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवातीला दोन ते तीन षटके संयमी फलंदाजी केली. जम बसल्यानंतर भारताच्या (IND vs NEP) सलामी जोडीने नेपाळची गोलंदाजांची पिटाई केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.