Maratha Reservation : जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद; सर्व शाळांना सुट्टी जाहीर

128
Maratha Reservation : जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद; सर्व शाळांना सुट्टी जाहीर

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटले आहे. जालना पाठोपाठ सोलापूर, औरंगाबाद, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलक आक्रमक झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज म्हणजेच मंगळवार ५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

सकल मराठा समाजाने (Maratha Reservation) लाठीमाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलिस अधीक्षक व उपपोलिस अधीक्षक यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात ‘जवाब दो’ हे आंदोलन करण्यात आले.

(हेही वाचा – Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांची समिती मनोज जरांगे पाटलांशी करणार चर्चा)

शहरातील प्राथमिक शाळांना आज सुटी

सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची (Maratha Reservation) हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी वाहतुकीची व्यवस्था बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांना आज ५ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी परिपत्रक काढून शाळांना सूचना दिल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.