महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायानेच बलात्कार केल्याची घडली आहे. ही महिला पोलीस शिपाई पुणे शहर पोलीस दलात असून तिला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटॉप असा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील डक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. पीडित महिला आणि मोघे यांची ओळख होती. कोरोनातील लॉकडाऊनच्या काळात मोघे महिला पोलीस शिपायाच्या घरी जेवायला जायचा. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले.
(हेही वाचा – Maratha Reservation : जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद; सर्व शाळांना सुट्टी जाहीर )
त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून ध्वनिचित्रफीत तयार करून ती प्रसारित करण्याची धमकी दिली. या महिला पोलीस शिपायावर त्याने वारंवार अत्याचार केले. तिला धमकी देऊन नवऱ्याला घटस्फोट देण्यासही भाग पाडले. त्यानंतर तिला पिस्तुलाचा धाक दाखवून घरातील पाच ते सहा तोळे दागिने, मोबाइल संच, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरला. महिलेने नुकतीच खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनैसर्गिक कृत्य, बलात्कार, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक तोटेवार तपास करत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community