कर्ज घेऊन घर बांधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर 65 बेसिस पॉइंट्सपर्यंत सूट दिली आहे. ही सवलत रेग्युलर होम लोन, फ्लेक्सिपे, एनआरआय, नॉन सॅलराईड आणि एम्पलॉईड हाऊसहोल्डसाठी लागू आहे. या सुविधेचा लाभ 31 डिसेंबर 2023 पर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे.
बँकेचा सध्याचा एक्स्टर्नल बेंचमार्क दर (EBR) 9.15 टक्के आहे. ज्या ग्राहकांना सिबिल स्कोअर 750-800 आणि त्यापेक्षा जास्त आहे,त्यांना व्याजदरावर 55 बेसिस पॉईंटसची सूट मिळत आहे. यानंतर ग्राहकांना 8.60 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल, तर 700 ते 749 दरम्यान सिबिल स्कोअर असणाऱ्यांना 65 बेसिस पॉईंट्सची सूट मिळेल. यानंतर 8.70 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. सध्या विनासूट हा व्याजदर 9.35 टक्के आहे. होमलोनसाठी किमान 2 हजार रुपये आणि जीएसटी आणि कमाल १०००० रुपये आणि जीएसटी किंवा लोन अमाऊंटच्या 0.35 टक्के प्रोसेसिंग फी आकारण्यात येईल.
(हेही वाचा – Bharat : ‘भारत माता कि जय’; देशाचे नाव बदलण्यास अमिताभ बच्चन यांचे अप्रत्यक्ष समर्थन )
सिबिल स्कोअर 650 – 699
ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर 650-699 दरम्यान आहे त्यांना व्याजदरात कोणतीही सूट मिळणार नाही. ज्यांचा सिबिल स्कोअर 550-649 दरम्यान असेल त्यांना 30 बेसिस पॉईंट्सची सूट मिळेल. सूट मिळाल्यानंतर हा व्याजदर 9.45 टक्के असेल. विना सूट हा व्याजदर 9.65 टक्के आहे.
सिबिल स्कोअर 151-200
151-200 दरम्यान सिबिल स्कोअर असलेल्या ग्राहकांना कर्जावर 65 बेसिस पॉईंट्सची सूट मिळणार आहे. प्रस्तावित व्याजदर 8.70 टक्के (ईबीआर – 0.45 टक्के) आहे. विना सूट हा व्याजदर 9.35 टक्के (ईबीआर 0.50 टक्के) असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community