निरोगी आरोग्यासाठी ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे वजन वाढीवर नियंत्रण, शरीरातील अतिरिक्त मेद कमी होणे, चयापचयाची क्षमता वाढणे…यांसह अनेक फायदे होतात, पण ग्रीन टीचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ग्रीन टी पिताना ‘या’ चुका करू नका –
– जर तुम्ही सकाळी अनाशेपोटी ग्रीन टीचं सेवन करत असाल, तर पचनाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी ग्रीन टी पिण्यापूर्वी कोणताही पौष्टिक पदार्थ खा.
– ग्रीन टी जास्त प्रमाणात प्यायल्यास तणाव, निद्रानाश आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
– ग्रीन टीमध्ये कॅफिन असल्याने रात्रीच्या वेळी ग्रीन टी प्यायल्याने झोपेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी कधीही ग्रीन टीचे सेवन करू नका.
– जेवल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिणे टाळा; कारण त्यामुळे अन्नातून पोषक तत्त्वे मिळण्यात अडथळे निर्माण होतात. जेवणानंतर ग्रीन टी पिण्याची सवय असेल, तर जेवल्यानंतर 1-2 तासांनंतरच ग्रीन टी प्या.
– ग्रीन टी काही औषधांसोबत घेतल्यास त्यावर प्रक्रीय होऊन याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Join Our WhatsApp Community