शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत म्हणजेच आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने ६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (ITI Admission) त्यामुळे आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे पुण्यातील औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – World Cup 2023 : जाणून घ्या भारताचा कोणत्या दिवशी कोणत्या संघाबरोबर होणार सामना)
आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिल्यामुळे काही कारणास्तव नियोजित मुदतीमध्ये प्रवेशअर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे, अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासह प्रवेशशुल्क भरून ६ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (ITI Admission)
संस्थास्तरीय तिसऱ्या समुपदेशन फेरीअंतर्गत सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत संधी उपलब्ध असेल, तसेच समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार आणि नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेश फेरीसाठी एकत्रित गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्याची व उमेदवारांना माहिती कळविण्याची कार्यवाही ७ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे.
नोंदणीकृत आणि प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांनी औद्यागिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करावा. तसेच संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेशफेरीसाठी उमेदवारांनी व्यक्तिश: ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीत सर्व मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे. (ITI Admission)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community