Indian Army: पप्पा घरी कधी येणार; प्रश्न अनुत्तरीतच, पुण्याच्या भवानी पेठेतील जवान दिलीप ओझरकर कारगिल येथे हुतात्मा

145
Indian Army: पप्पा घरी कधी येणार; प्रश्न अनुत्तरीतच, पुण्याच्या भवानी पेठेतील जवान दिलीप ओझरकर कारगिल येथे हुतात्मा
Indian Army: पप्पा घरी कधी येणार; प्रश्न अनुत्तरीतच, पुण्याच्या भवानी पेठेतील जवान दिलीप ओझरकर कारगिल येथे हुतात्मा

भवानी पेठ येथील भारतीय सैन्य दलातील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे कारगिल येथे कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. ही घटना रविवारी घडली. सध्या ते हवालदार या पदावर कार्यरत होते. गेल्या दीड महिन्यापूर्वी ते घरी सुट्टीवर आले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

रविवारी, 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान दिलीप ओझरकर हे आपल्या इतर सहकाऱ्यांसह सैन्याच्या गाडीतून कारगिल येथून प्रवास करत होते. अचानक गाडीचा अपघात झाल्याने त्यादरम्यान त्यांचे सर्व सहकारी जखमी झाले, मात्र ओझरकर या अपघातात हुतात्मा झाले.

(हेही वाचा – Sbi Home-Loans : कर्ज घेऊन घर बांधायचे आहे का ? स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना मिळणार सवलत)

मुलांशी अखेरचे संभाषण !

दिलीप ओझरकर वर्षातून एकदा दहीहंडी आणि गणेशोत्सवाला आवर्जून घरी येत असत.3 सप्टेंबर रोजी सकाळीच त्यांचे लहान मुलांशी फोनवर अखेरचे संभाषण झाले होते. त्यावेळी ‘पप्पा, कधी येणार तुम्ही, अशी विचारणा सतत मुले करत होती.’ त्यामुळे ओझरकर यांनी त्यांना व्हिडियो कॉलद्वारे भारत-पाकिस्तान सीमेवर असल्याचे दाखवले. सोमवारी रात्री लोहगाव विमानतळावर त्यांचे पार्थिव आणण्यात आले. मंगळवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात धोबीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.