राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ लिहिताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुध्दा इंडियाच्या जागी भारत हा शब्द वापरायला सुरवात केली आहे. सविस्तर वृत्त असे की, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘जी-२०’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांकरिता मेजवानीचे आयोजन केले आहे. यात त्यांनी स्वत:चा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा केला आहे. देशातील २८ विरोधी पक्षांची आघाडी तयार झाली असून या आघाडीला त्यांना ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. यामुळे देशातील लोकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्षांच्या नकारात्मक गोष्टी या इंडियाच्या नावाने उच्चारल्या जातील याचे शल्य देशवासीयांच्या मनात निर्माण झाले होते.
अशातच, राष्ट्रपती यांनी स्वत:चा उल्लेख ‘प्रेसिडेंट आफ भारत’ असा केला आहे. राष्ट्रपतीच्या पत्रिकेवर बदल झाल्याचे पाहून भारतीय जनता पक्षातील नेत्यांच्या अंगात बारा हत्तींचे बळ संचारले आहे. देशभरातील भाजपच्या नेत्यांनी आपल्या देशाला ‘इंडिया’ ऐवजी भारत संबोधण्यास सुरवात केली आहे. भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनी ‘इंडिया’ हा शब्द ब्रिटीशांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही भारताबाबत ट्वीट केले आहे.
(हेही वाचा – Bharat : भारत कसा झाला इंडिया? ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या शब्दांचा काय आहे इतिहास?)
काय म्हणाले भाजप खासदार हरनाथ यादव
भाजप खासदार हरनाथ सिंह यादव म्हणाले की, संपूर्ण देश सध्या इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरण्याची मागणी करत आहे. भारत हा शब्द आपल्याला ब्रिटिशांनी दिलेल्या शिव्यासारखा आहे. तर भारत हा शब्द आपली संस्कृती दर्शवतो. आपली राज्यघटनाही बदलली पाहिजे आणि त्यात भारत हा शब्द जोडला पाहिजे. ते पुढे म्हणाले, “ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये भारत हा गरीब आणि अशिक्षित लोकांचा देश आहे असे वर्णन केले आहे. ब्रिटिशांनी मुद्दाम गुलाम देशाचा संबंध भारताशी जोडला. हा आपल्या देशाचा घोर अपमान आहे.
दुसरीकडे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही भारत या शब्दावर भर दिला आणि त्यांच्या एक्सवरच्या पोस्टमध्ये ‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ या सामान्य शब्दाऐवजी ‘रिपब्लिक ऑफ भारत’ असे लिहिले आहे. ते म्हणाले की आमची सभ्यता आता वेगवान आणि निर्भयपणे अमृत कालाकडे वाटचाल करत आहे याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले, “भारत बोलण्यात आणि लिहिण्यात अडचण का आहे. आपल्या देशाचे नाव भारत हे पुरातण कालखंडात आहे आणि ते घटनेतही स्पष्ट करण्यात आले आहे. विनाकारण आणि जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणे जे दुर्दैवी आहे.”
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या राष्ट्रपती भवनातील जी-२० शिखर परिषदेच्या भोजनाचे निमंत्रण ‘भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने’ पाठवण्यात आल्याच्या दाव्यावर विधान केले आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाचे भारतावर प्रेम आहे आणि प्रत्येक देशवासीयाचे आपल्या देशावर प्रेम आहे. आता ज्यांचे भारतावर प्रेम नाही ते यावर प्रश्न उपस्थित करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community