MHADA : म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ

पुणे मंडळाच्या या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.

157
MHADA : म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ
MHADA : म्हाडा पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ

म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.

‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात बोलतांना संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले की, पुणे मंडळाच्या या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकाधिक अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच याप्रसंगी पुणे मंडळाच्या अधिकार्‍यांना सोडत प्रक्रिया सुलभ आणि सुरळीत पार पाडण्याकरिता शुभेच्छा दिल्या. या सोडतीच्या माध्यमातून ५८६३ नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीप्रती आपले उत्तरदायित्व अधिक ठरत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

नूतन IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्री करिता सोडतीची प्रक्रिया राबवली जात असून म्हाडाच्या मुंबई मंडळाने ज्याप्रमाणे सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्काळ ऑनलाईन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही केली. अशाच प्रकारची अंमलबजावणी पुणे मंडळाच्या सोडतीतही करुन सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या सुलभ, लोकाभिमुख, प्रशासकीय कार्यप्रणालीची प्रचिती द्यावी, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, मुख्य अभियंता-३ शिवकुमार आडे, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले आदी उपस्थित होते. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. दिनांक ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून दिनांक २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे.

(हेही वाचा – Bharat : भाजप नेत्यांकडून ‘भारत’चा शंखनाद)

दिनांक ०६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजेपासून नोंदणी केलेल्या अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून दिनांक २७ सप्टेंबर, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दिनांक ०६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ते २८ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. दिनांक २९ सप्टेंबर, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे-हरकती १२ ऑक्टोबर, २०२३ रोजी दुपारी ०३ वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायंकाळी ०७ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.