Girish Mahajan : एकनाथ खडसेंना १० मंत्रीपदे घेताना काही वाटले नव्हते का? – गिरीश महाजनांचा टोला  

117

राज्यात आता खोक्याचे राज्य सुरू झालेले आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर केली. ते जळगावमध्ये आयोजित सभेत बोलत होते. त्यांच्या या घणाघाती टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

तुमची मस्ती लोकांनी, बांधकाम व्यावसायिकांनी पाहिली 

गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढत आहात. दहा दहा मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटले नाही का? तुमची मस्ती लोकांनी आणि सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पाहिली आहे. त्याची फळ तुम्ही भोगत आहात. आता उर बडवून काहीही उपयोग नाही.

दूध संघ, बॅंकेतून तुम्हाला लोकांनी हाकलले 

गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, 30-35 वर्षे तुम्ही भाजपात होता. सगळ्यात जास्त पदे तुम्ही भोगली आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवली आहे. तुमचा विधानसभेत पराभव केला, दूध संघ आणि बँकेतून तुम्हाला हाकलले, तुमचे काय राहिले आहे. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत, असे महाजन म्हणाले. ओबीसींना आरक्षण दिले नाही तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असा घोषणा करणारा भाजप नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. पण प्रत्यक्षात असे झालेच नाही. हा माणूस खोटारडा आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. ते जळगावात सभेला संबोधित करत होते. भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी खडसेंनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही स्टाईल वापरून फडणवीसांचे जुने व्हिडिओ दाखवून जोरदार टोलेबाजी केली.

(हेही वाचा Bharat : भारत कसा झाला इंडिया? ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या शब्दांचा काय आहे इतिहास?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.