विदर्भात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुन्हा मोसमी पाऊस सक्रिय होणार आहे, असे हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. (Monsoon Returns) सप्टेंबर संपला, तरी अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. काही ठिकाणी अजूनही पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत पुढील ५ दिवस राज्यात काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. विदर्भात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ६ सप्टेंबर या दिवशी विदर्भाच्या बहुतांश भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : मुंबईतील बॅनर, फलकांवरील कारवाईत पक्षपात, मग कशी होणार मुंबईत बॅनरमुक्त!)
चंद्रपूर आणि इंदापूर येथे पावसाची हजेरी
५ सप्टेंबर या दिवशी चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. काळ्याकुट्ट ढगांमुळे ऐन दुपारी शहरात काळोख पसरला. विजांच्या गडगडाटासह चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली, तर पावसामुळे सुकत चाललेल्या धान-कापूस-सोयाबीन पिकांना मात्र संजीवनी मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सलग दुस-या दिवशी पावसाने चांगलीच हजेरी लावली. इंदापूर शहरासह तालुक्यातील निमगाव केतकी, शेळगाव, लोणी देवकर, कौठळी या भागांत दमदार पाऊस झाला. महिनाभर दडी मारल्यानंतर 2 दिवस चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे उरलेला पावसाळाही असाच वरुणराजा बरसावा, अशी आशा शेतकरी करत आहेत. (Monsoon Returns)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community