भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोकडून चांद्रयान ३ संदर्भात सातत्याने अपडेट देण्यात येत आहेत. चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्टला उतरल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरने काम सुरु केले होते. चंद्रावर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडरला इस्त्रोने स्लीप मोडवर जाण्याची कमांड दिली होती. इस्त्रोला आता २२ सप्टेंबरची प्रतीक्षा आहे. कारण, या दिवशी चंद्रावर सूर्योदय होईल. सूर्यप्रकाशाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरवरील सोलर पॅनेल चार्ज होऊन ते पुन्हा सक्रीय करता येतात का यासाठी इस्त्रोने रिसीव्हर ऑन ठेवले आहेत. इस्त्रोतील वैज्ञानिकांचे लक्ष २२ सप्टेंबरकडे लागलेले असताना चंद्रावरील विक्रम लँडरचा नवा फोटो शेअर करण्यात आला आहे.
इस्त्रोने चंद्रावर दिमाखात उभ्या असलेल्या विक्रम लँडरचा फोटो शेअर केला आहे. ३ सप्टेंबरला विक्रम लँडरने पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केले होते. आता इस्त्रोने शेअर केलेल्या फोटोत विक्रम लँडरसह चंद्राच्या भूभागावर लाल, निळा आणि हिरवा रंग दिसत आहे. मात्र, चंद्राच्या भूभागावर हे रंग कसे दिसू लागले हे इस्त्रोने सांगितले आहे.
काय आहे रंगीत फोटो मागची गोष्ट?
खरे तर चंद्राच्या भूभागावर रंग आढळून येत नाहीत. तर, मग या फोटोत लाल, निळा आणि हिरवा रंग कसा दिसत आहे. इस्त्रोने विक्रम लँडरचा हा फोटो शेअर केला आहे तो थ्रीडी फोटो आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार हा फोटो कित्येक फोटो जोडून शेअर करण्यात आला आहे. याला एनाग्लिकफ स्टीरिओ किंवा मल्टी व्यू इमेज म्हटले लं जातं. यामध्ये थ्री डायमेंशन इमेज बनवली जाते. हा फोटो देखील एनाग्लिफ नॅवकॅम स्टीरिओ इमेजचा वापर करुन बनवण्यात आली आहे. यामध्ये प्रज्ञान रोवरनं टिपलेल्या लेफ्ट आणि राईट इमेजचा समावेश करण्यात आला आहे.
(हेही वाचा Maratha Reservation : जीआर नाही निघाला तर अन्न पाण्याचा त्याग करणार; मनोज जरांगे उपोषण सुरूच ठेवणार)
Join Our WhatsApp Community