Mirabai Chanu Record : चिनी खेळाडूने मोडला मीराबाई चानूचा विश्वविक्रम

मीराबाई चानूचा ११९ किलो वजन उचलण्याचा निकाल एका चिनी खेळाडूने मोडला आहे. त्यामुळे आगामी आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये जोरदार चुरस दिसणार आहे

141
Paris Olympic 2024 : भारोत्तोलन भारताची भिस्त पुन्हा एकदा मीराबाई चानूवर

ऋजुता लुकतुके

चिनी भारोत्तोलक जियान हुईहुआ हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानूचा ११९ किलोंचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. हुईहुआने क्लिन अँड जर्क प्रकारात १२० किलो वजन उचललं. भारोत्तोलनाची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा रियाध इथं सुरू आहे.

मीराबाईने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान २०२१ मध्ये हा विक्रम कायम केला होता. हायहुईने फक्त मीराबाईचा विक्रमच मोडला असं नाही, तर नवीन विक्रम कायम करताना २१५ किलो वजन उचलून दाखवलं आहे. म्हणजेच एकूण वजनचा विक्रमही आता हायहुईच्या नावावर आहे. तिने सध्याची ऑलिम्पिक विजेती खेळाडू चीनचीच होऊ झिऊई हिचा विक्रम मोडीत काढला आहे.

(हेही वाचा-Delhi : जी-२० परिषदेसाठी राजधानी सज्ज

क्लिन अँड जर्कमधील या कामगिरीनंतर हायहुईने स्नॅच प्रकारातही ९५ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिची चिनी सहकारी आणि ऑलिम्पिक चॅम्पियन होऊ झिऊईही या स्पर्धेत खेळतेय. आणि हायहुईने तिलाही मागे टाकलं आहे.

होऊ झिऊई २१२ किलो वजनासह दुसरी आली आहे. या वजनी गटात भारताची मीराबाई चानू सहभागी होते. पण, यंदा तिने आशियाई क्रीडास्पर्धांच्या तयारीसाठी विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. पण, आगामी आशियाई क्रीडास्पर्धेत दोघी चिनी खेळाडू आणि मीराबाई चानू असा मुकाबला रंगणार आहे. आणि सध्याचा चिनी खेळाडूंचा फॉर्म बघता ही लढत चुरशीची होणार असंच दिसत आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.