Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल

उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू

192
Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल
Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकादा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान मराठा आरक्षणासाठी मागील ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत.कालही ते झोपूनच होते आणि आज त्यांना सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मराठा आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळ दाखल झाले आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने वैद्यकीय पथक उपोषनस्थळी दाखल झालं आहे. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाणी पतळी कमी झाल्याने त्यांना सलाइन लावण्यात आले.

(हेही वाचा : Delhi : जी-२० परिषदेसाठी राजधानी सज्ज)

यापूर्वी राज्य सरकाच्या शिष्ठमंडळाकडून मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, एक महिन्याचा वेळ द्यावा,असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं. मात्र एक महिन्याचा वेळ कशाला हवा? चार दिवसांची वेळ पुरेसा आहे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्याच भूमिकेवर जरांगे ठाम आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.