Arun Kumar Sinha Death : पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणारे एसपीजी प्रमुख अरुणकुमार सिन्हा यांचं निधन

147
Arun Kumar Sinha Death : पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणारे एसपीजी प्रमुख अरुणकुमार सिन्हा यांचं निधन
Arun Kumar Sinha Death : पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणारे एसपीजी प्रमुख अरुणकुमार सिन्हा यांचं निधन

पंतप्रधानांना सुरक्षा पुरवणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)चे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे गुरुग्राम येथील रुग्णालयात निधन झाले.ते ६१ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सिन्हा हे १९८७ च्या बॅचचे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांना नुकतीच सेवेत मुदतवाढ देण्यात आली होती. २०१६ पासून एसपीजीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं.

सिन्हा यांनी आपल्या करियरमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.ते केरळचे डीसीपी कमिशनर, इंटेलिजन्स आयजी आणि तिरुवनंतपुरममध्ये प्रशासन आयजी देखील होते. मालदीव येथे राष्ट्रपती अब्दुल गयूम यांच्या हत्या प्रकरणाची उकल केल्यामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यांनी हत्या केलेल्या आरोपींना दिल्लीतून पकडले होते. तेव्हा सिन्हा केरळमध्ये तैनात होते. त्यांचे काम पाहून त्यांच्या सेवेतील कार्यकाळात अनेक पुरस्कार आणि पदके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल)

एसपीजी म्हणजे काय ? 

पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपवर असते. या गटाची स्थापना १९८५ मध्ये झाली होती, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. एसपीजी पंतप्रधानांचे घर, कार्यालय, कार्यक्रम, देशात किंवा परदेशात त्यांनी दिलेल्या भेटीवेळी पंतप्रधानांच्या सुरक्षेचे काम पहाते. २०१९ मध्ये नवीन कायदा अंमलात आणून एसपीजीसंदर्भातील नियमात बदलण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.