Kirit Somaiya : किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात गुन्हा दाखल

या प्रकरणात दोन संपादकांवर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

155
Kirit Somaiya : किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात गुन्हा दाखल
Kirit Somaiya : किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणात गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात  ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार आणि मीडिया पर्सन अनिल थत्ते यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांचा स्पष्ट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात या खासगी वृत्त वाहिनीच्या संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचे व्हिडीओ या वृत्त वाहिनीने दाखवले होते. त्यामुळे किरीट सोमय्या यांची बदनामी झाली होती. हे प्ररकण राज्यभर गाजले होते. काही पक्ष, संघटनांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. आता या प्रकरणात दोन संपादकांवर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा-Parliament Special Session: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीत होणार कामकाजाला सुरुवात)

किरीट सोमय्यांचा जबाब

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आणि सायबर पोलिसांनी तपास हाती घेतला आहे. मंगळवारी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आपला जबाब दिला आहे. त्या नंतर या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर आता रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभागृहातही मांडला मुद्दा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला होता. हा मुद्दा राजकीय वर्तुळात देखील चांगलाच गाजला होता. त्यामुळे भाजप आणि सोमय्या यांचे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला होता. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते.

सभागृहात सादर केला पेनड्राईव्ह

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या प्ररकणी सभागृहात किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आमच्या कानावर आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. तसेच अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला होता. सभागृहात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.