India ऐवजी Bharat; काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

968
मुख्यमंत्री cm eknath shinde

संविधानातून ‘इंडिया’ (India) हा शब्द काढून टाकण्यासाठी मोदी सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडण्याचा विचार करत आहे. राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20 डिनरच्या निमंत्रण पत्रात ‘ The President of India’ ऐवजी ‘The President of BHARAT”  लिहिले, त्यावरून देशभरात हा कयास लावला जात आहे. त्याला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले, केंद्र सरकारने G20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर ‘इंडिया’ (India) ऐवजी ‘भारत’ (Bharat) असा उल्लेख केला आहे. हा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे. देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is ‘Bharat’ असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘भारतमाता कि जय’ हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती. याचबरोबर ”साने गुरुजींनी देखील बलसागर भारत (Bharat) होवो विश्वात शोभूनी राहो… असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला ‘भारत’ या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. भारतमाता कि जय!” असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

(हेही वाचा Delhi : जी-२० परिषदेसाठी राजधानी सज्ज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.