मध्य रेल्वेमार्गावरील सगळ्यात जास्त गर्दी असलेले स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानकाची ओळख आहे. येथे दिवसेंदिवस झपाट्याने वाढलेले नागरीकरण, वाढणारी लोकसंख्या आणि प्रवाशांची वाढती संख्या यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात सर्व सोयीसुविधा देण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ऑक्टोबर महिन्यात या स्थानकात प्रवाशांना अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून टप्पा 3/ए अंतर्गत हे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाने मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील एकूण 17 रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डोंबिवली, मुलुंड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही स्थानकांच्या विकासासाठी 120 कोटिंचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्वयंचलित रेल्वे स्थानकाचा विचार करून या स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत.
( हेही वाचा – Dahihandi festival : पुणेकरांना रात्री 10 वाजेपर्यंत दहीहंडी साजरी करता येणार, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन)
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाअंतर्गत प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. गेल्या 20 वर्षांत या स्थानकावर रेल्वे मंडळाकडून दुसऱ्यांदा हे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community