- ऋजुता लुकतुके
मोटरमनच्या कामाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या नेहमीच्या प्रवाशांनी त्यांना हटके निरोप दिला. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबई नगरीत एका मोटरमनचा कामाचा शेवटचा दिवस सगळ्या प्रवाशांनी मिळून साजरा केल्याचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. मुंबई लोकल युजर्स या ट्विटर अकाऊंटने हा व्हीडिओ ३ सप्टेंबरला पहिल्यांदा टाकला. त्यांनी व्हिडिओवर एक छोटासा संदेश लिहिला आहे, ‘आम्हाला इतकी वर्षं धक्केविरहित आणि सुरक्षित रेल्वेसेवा देणाऱ्या व्यक्तीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!’
हळू हळू हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झालाय. आणि एकट्या ट्विटरवर तो ५०,०००च्या वर लोकांनी पाहिलाय. मोटरमनचं नाव यात स्पष्ट केलेलं नाही. पण, त्यांनी आपली शेवटची लोकल ट्रेन सीएसएमटी स्थानकात लावल्यावर प्रवाशांनी चक्क ढोल-ताशे बडवून त्यांना मानवंदना दिली. तसंच त्यांना ओवाळून प्रवासी त्यांना टिळाही लावताना दिसतायत. त्यानंतर ढोल ताशाच्या गरजावर लोक उत्स्फूर्तपणे नाचतानाही दिसतायत.
A celebration last week when a motorman drived the local train for the last time on his retirement day.
After putting in many years of service that to without a snag is quite a big achievement.@AshwiniVaishnaw @RailMinIndia pic.twitter.com/It9wpWmMNI— Mumbai Railway Users (@mumbairailusers) September 3, 2023
(हेही वाचा – Tata Haldiram Deal : टाटा समुहाचा हलदीराम विकत घेण्याचा प्रयत्न?)
‘गेल्या आठवड्यात एक मोटरमन सेवेतून निवृत्त झाले. इतकी वर्षं त्यांनी इमाने इतबारे सेवा बजावली. आणि त्यांचं रेल्वे चालकाचं कौशल्यही वादातीत होतं,’ असं ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे. मुंबई रेल्वे युजर्स हे ट्विटरवरील एक सक्रिय खातं आहे. मुंबई उपनगरी सेवेतील मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर अशा सर्व मार्गांवरील रेल्वेविषयीचे सगळे अपडेट इथं दिले जातात. या खात्याचे जवळ पास दीड लाख फॉलोअर्स आहेत. मोटरमनविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या पोस्टमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनाही टॅग करण्यात आलंय. इतर ट्विटरच्या सदस्यांना ही पोस्ट आवडलीय हे त्यांच्या कमेंटवरून दिसतंय. एकाने लिहिलंय की, ‘भारतीय रेल्वे मला म्हणूनच आवडते.’ तर दुसऱ्या एकाने म्हटलंय, ‘मुंबई मेरी जान असं म्हणतात ते उगीच नाही.’ आणखी एका वाचकाने सामान्य नोकरदार व्यक्तीचा कामाचा शेवटचा दिवस असा साजरा केल्याबद्दल खास आनंद व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community