राज्यात आज पासून पावसाचा (Rain) जोर वाढणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत देखील सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली.
मुंबईत गुरुवार( ७सप्टेंबर) सकाळ पासून सायन, दादर तसेच मुंबई उपनगरातही परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाल्याने वाढत्या उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. विदर्भातील काही भागात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.हे. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
गेल्या महिन्याभरात पावसाने राज्यात दडी मारली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सुकलेल्या पिंकाना नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं असून हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे दिसत असल्याने पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे.यामुळे राज्यात आजपासून बहुतांश ठिकाणी मान्सुन सक्रिय होणार आहे. राज्यात पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह वीजांचा कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community