जन्माष्टमीचा सण गुरुवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय. ‘गोविंदा आला रे आला’ च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी (Dahi Handi) निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळणार आहेत. ठाण्यासह मुंबई येथील दही हंडी उत्सव नेहमीच लक्षवेधी आणि चर्चेचा असतो. त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर हे पाहायला मिळणार असले तरी दहा थर कोण लावणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत. बृहन्मुंबई महानगरामध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
मागाठाणे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे याच्या वतीने भव्य दिव्य दहीकाला आयोजन करण्यात आले आहे याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील मानाची हंडी आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती. टेंभी नाका इथे पहिल्या गोविंदा पथकाचे आगमन झाले आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना त्या पावसाचा आनंद घेत हे पथक ठाण्यात दाखल झालं आहे. मुलुंड येथील साईराज गोविंदा पथकाचे गोविंदा सलामी देण्यासाठी सज्ज आहेत. पाऊस कोसळत असला तरी त्यांच्या उत्साह कुठेही कमी झालेला नसून या मानाच्या हंडीच्या ठिकाणी सलामी देणे हेच आम्ही मानाचं समजतो अशी भावना गोविंदा व्यक्त करत आहेत.
(हेही वाचा : India-ASEAN Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंडोनेशियामध्ये भव्य स्वागत)
रुग्णालयांमध्ये’ राखीव खाटा
मुंबई शहर भागासह पूर्व व पश्चिम उपनगरांत हा दिवस ऐतिहासिक ठरावा, यासाठी विविध गोविंदा पथक आणि संबंधित यंत्रणा अथक प्रयत्न करीत असतात. मुंबई महानगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणा-या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात १०, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात ०७ रूग्णशय्या आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ४ रूग्णशय्या आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community