पंतप्रधान नरेंद्र मोदी २० व्या आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळी इंडोनेशियाला पोहोचले. यादरम्यान जकार्ता विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक नृत्य सादर केले. पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांचीही भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान आसियान-भारत परिषदेत सहभागी झाले.
आसियान इंडिया समिटमध्ये सहभागी होताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आमची भागीदारी चौथ्या दशकात प्रवेश करत असताना भारत-आसियान शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणं ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. मी इंडोनेशियाचे राष्ट्रपती विडोडो यांचे या परिषदेच्या अद्भूत आयोजनाबद्दल अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. कंबोडियाच्या पंतप्रधानांनी अलीकडेच पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
(हेही वाचा-Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सांगली आणि बीड मध्ये कडकडीत बंद)
जागतिक विकासात आसियानची भूमिका महत्त्वाची आहे. २१ वे शतक हे आशियाचे शतक आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (७ सप्टेंबर) जकार्ता येथे सुरू असलेल्या ४३ व्या एशियन शिखर परिषदेला संबोधित केले. पीएम मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही भारत-आसियान मैत्री दिन साजरा केला आणि त्याचे व्यापक धोरणात्मक भागीदारीत रूपांतर केले आणि आज आमची भागीदारी चौथ्या दशकात प्रवेश करत आहे. जकार्ता येथे आसियान-भारत शिखर परिषदेला संबोधित करताना, पीएम मोदी म्हणाले की, आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा आधारस्तंभ आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, आमची भागीदारी नवीन आयाम देत असून चौथ्या दशकात पोहोचली आहे अशा वेळी आसियान-भारत शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल मी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांचे अभिनंदन करतो.
प्रवासी भारतीयांच्याही मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या
पंतप्रधानांनी गुरुवारी जकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आसियान-भारत शिखर परिषदेला हजेरी लावली. इंडोनेशियातील जकार्ता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी, भारतीय समुदायानेही पंतप्रधानांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधानांनीही त्यांचे अभिनंदन केले.पीएम मोदी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहोचताच भारतीय स्थलांतरितांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community