दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-20 (G20 India )परिषदेची मोठी बैठक पार पडणार आहे. या बैठकीला अनेक देशांचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ‘जी-20 इंडिया’ नावाचं एक खास अॅपही लाँच केलं आहे.सर्वसामान्यांन पर्यंत पोहचण्यासाठी या अॅपचे प्रयोजन करण्यात आले आहे.अनेक भाषांमध्ये या अॅप मधून जी-20 परिषदेची माहिती मिळणार आहे.
त्यामुळे हे अॅप सर्वांनी डाऊनलोड करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून जी-२० बैठकांचं आणि कार्यक्रमांचं वेळापत्रक, प्रेस रिलीज आणि जी-२० काय आहे याबाबत सर्व माहिती मिळू शकते. विशेष म्हणजे हे अॅप जगभरातील तब्बल २४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळेच, जी-२० परिषदेला उपस्थित असणाऱ्या इतर देशांमधील नागरिकांनाही हे वापरता येणार आहे. या अॅपमध्ये नेव्हिगेशन सुविधा देखील देण्यात आली आहे. विदेशी प्रतिनिधींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मदत होणार आहे.
(हेही वाचा : Aaditya L1 : आदित्य एल-1 ने काढला सेल्फी आणि पृथ्वी अन् चंद्राचेही काढले फोटो)
रजिस्ट्रेशन करणे गरजेचे
G20 India हे अॅप अँड्रॉईड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. याठिकाणी सर्च केल्यानंतर हे अॅप तुम्हाला मिळेल. डाऊनलोड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. यानंतर जी-20 परिषद आणि बैठकीबाबत तुम्हाला सर्व माहिती मिळेल असेही सांगण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community