Smriti Irani On Sanatan Dharma Defamation : …तोपर्यंत धर्माला कोणीही आव्हान देऊ शकत नाही; स्मृती इराणी यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना प्रत्युत्तर 

144
Smriti Irani On Sanatan Dharma Defamation : ...तोपर्यंत धर्माला कोणीही आव्हान देऊ शकत नाही; स्मृती इराणी यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना प्रत्युत्तर 
Smriti Irani On Sanatan Dharma Defamation : ...तोपर्यंत धर्माला कोणीही आव्हान देऊ शकत नाही; स्मृती इराणी यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना प्रत्युत्तर 

भगवान श्रीकृष्णाचा जयघोष इतक्या मोठ्या आवाजात करा की, सनातन धर्माला आव्हान देणाऱ्या लोकांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. (Smriti Irani On Sanatan Dharma Defamation) जोपर्यंत भक्त जिवंत आहेत, तोपर्यंत आमच्या ‘धर्म’ आणि श्रद्धेला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असे घणाघाती उद्गार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काढले. त्या दिल्लीतील  द्वारका येथील जन्माष्टमी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करत होत्या. त्यांनी या वेळी उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांच्या ‘सनातन धर्म’ वक्तव्याचे समर्थन करणाऱ्यांचा समाचार घेतला. या वेळी त्यांनी  ‘कृष्ण कन्हैया लाल की जय…’  असा जयघोष उपस्थितांकडून करून घेतला.

(हेही वाचा – PM Modi On Sanatan Dharma Defamation : योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज; उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माविषयी केलेल्या अवमानकारक टिप्पणीवर पंतप्रधानांचे मत)

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकरणी योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे विधान केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत केले आहे. याआधी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनातन धर्म वादाला मंत्र्यांनी समर्पक उत्तर द्यावे आणि विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी तथ्यांचा वापर करावा, असे पंतप्रधान म्हणाले. उदयनिधी स्टॅलिन यांनी चेन्नई येथे केलेल्या या वक्तव्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक नेते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करून सनातन धर्माच्या अवमानाचा निषेध केला आहे. ‘सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. ६ सप्टेंबर या दिवशी उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांचे समर्थन करणारे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील दोन वकिलांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. (Smriti Irani On Sanatan Dharma Defamation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.