M.K. Stalin support Udaynidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणाऱ्या मुलाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे समर्थन; पंतप्रधानांनाच दिला सल्ला 

148
M.K. Stalin support Udaynidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणाऱ्या मुलाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे समर्थन; पंतप्रधानांनाच दिला सल्ला 
M.K. Stalin support Udaynidhi Stalin : सनातन धर्माचा अवमान करणाऱ्या मुलाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे समर्थन; पंतप्रधानांनाच दिला सल्ला 

द्रमुकचे नेते आणि तमिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या अवमान केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले पाहिजे’, असे मत व्यक्त केले आहे. (M.K. Stalin support Udaynidhi Stalin) उदयनिधी स्टॅलिन यांचे वडील आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना त्याविषयी पोटशूळ उठला आहे. ‘पंतप्रधानांना तर सर्वच तपास यंत्रणा हाताशी असतात, त्यामुळे त्यांनी कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया देताना आधी त्याने नेमके काय म्हटले आहे, हे तपासायला पाहिजे. त्यानंतरच आपली प्रतिक्रिया द्यायला हवी. पण आपले पंतप्रधान उदयनिधींबाबत पसरवलेल्या खोट्या विधानांवरच प्रतिक्रिया देत आहेत’, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर टिप्पणी केल्यानंतर एम. के. स्टॅलिन यांनी त्यांना हे शोभत नसल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – Municipal Schools : महापालिका शाळांमध्ये पुन्हा रात्र अभ्यासिका वर्ग भरणार!)

म्हणे, विधान चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेले विधान हे चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे. उदयनिधींनी सनातनी विचारांच्या लोकांच्या नरसंहाराचे आवाहन केल्याचे चुकीचे सांगितले जात आहे. भाजपाने सोशल मीडियात नेमलेल्या झुंडी उत्तर भारतात उदयनिधींबाबत खोटे विधान पसरवत आहेत. उदयनिधी यांनी ‘नरसंहार’ हा शब्द तमिळमध्ये किंवा इंग्रजीतूनही आपल्या विधानात उच्चारलेला नाही. पण खोटं पसरवताना याचा दावा करण्यात येत आहे, असा दावा स्टॅलिन यांनी केला जात आहे.

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकरणी योग्य प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे विधान केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत केले आहे. याआधी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांसोबतच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनातन धर्म वादाला मंत्र्यांनी समर्पक उत्तर द्यावे आणि विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी तथ्यांचा वापर करावा, असे पंतप्रधान म्हणाले. ‘सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. ६ सप्टेंबर या दिवशी उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांचे समर्थन करणारे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील दोन वकिलांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. आतापर्यंत अनेक भाजप नेते आणि हिंदुत्ववादी यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्यचा निषेध केला आहे. (M.K. Stalin support Udaynidhi Stalin)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.