मुंबई महानगरपालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू कराव्यात, अशी मागणी भाजपचे माजी नगसेवक अभिजीत सामंत यांनी राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे केली होती. त्यापूर्वी सामंत यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये तत्कालीन न महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांना निवेदन देऊन अभ्यासिका वर्ग सुरू करण्याची मागणी केली होती. हे त्यांनी मुंबई महानगरामध्ये गरीब विद्यार्थ्यांना लहान घर व दाट लोकवस्तीमधील अशांतता यामुळे अभ्यासाला पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणीक विकासास बाधा येते. काही वर्षापूर्वी मनपाच्या शाळांमध्ये काही वर्ग सायंकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाकरीता उपलब्ध करुन देत असत.
परंतू सध्या मनपाच्या नविन धोरणामुळे हे वर्ग उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणीक नुकसान होत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत ही मागणी केली होती. परंतु तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे आयुक्तांनी सामंत यांची मागणी मान्य करण्यास विलंब केला. त्यामुळे राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यावर त्यांनी उपनगराचे पलकमत्री लोढा यांच्याकडे या मागणीबाबत पाठपुरावा केला. या मागणीबाबत लोढा यांनी महापालिका आयुक्त तसेच शिक्षण विभाग यांना अशा प्रकारची रात्र अभ्यासिका महापालिका शाळेत सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाने विलेपार्ले येथील शाळेत ही पहिली रात्र अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाने सुरू केली असून या अंतर्गत हा सोहळा होत आहे.
या सोहळ्यास स्थानिक खासदार गजानन कीर्तीकर, स्थानिक आमदार ऋतुजा लटके, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे अध्यक्षतेस्थानी असतील. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी. आदी मान्यवर या समारंभास उपस्थित राहणार आहेत.