I.N.D.I.A. Alliance : झारखंडमध्ये इंडियाच्या जागांसाठी संघर्ष अटळ

पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाबनंतर आता झारखंडमधील झामुमोच्या नेत्यांनी काँग्रेसला गुडघ्यावर आणण्यासाठी कंबर कसली आहे.

181
I.N.D.I.A. Alliance : झारखंडमध्ये इंडियाच्या जागांसाठी संघर्ष अटळ
I.N.D.I.A. Alliance : झारखंडमध्ये इंडियाच्या जागांसाठी संघर्ष अटळ

लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी विरोधी पक्षांनी आयएनडीआयए नावाची आघाडी तयार केली असली तरी त्यात एकामागून एक विघ्न येत असल्याचे चित्र देशात बघायला मिळत आहे. पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पंजाबनंतर आता झारखंडमधील झामुमोच्या नेत्यांनी काँग्रेसला गुडघ्यावर आणण्यासाठी कंबर कसली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेच्या निवडणुकीत झारखंडमध्ये जागावाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयएनडीआयए आघाडीसाठी झारखंड हे एक महत्वाचे राज्य आहे. अशात, येथेही भाजपच्या विरोधात सर्वांनी एकच उमेदवार द्यायचा असा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु, झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी आतापासूनच आक्रमक भूमिका घ्यायला सुरवात केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि झामुमोची आघाडी होती. तेव्हा काँग्रेसने नऊ जागांवर निवडणूक लढली होती आणि झामुमोच्या हाती फक्त चार जागा आल्या होत्या. आता झामुमो हा हिशोब बरोबर करण्याच्या तयारीत आहे. झारखंडमध्ये लोकसभेच्या १४ जागा आहेत. यात ११ खासदार भारतीय जनता पक्षाचे आणि काँग्रेस, झामुमो आणि एजेएसयू पक्षाचे प्रत्येकी एक खासदार आहे. काँग्रेसने नऊ जागा लढविल्या होत्या आणि फक्त एक खासदार निवडून आला होता. तर झामुमोने चार जागा लढविल्या होत्या आणि एक खासदार निवडून आला होता.

(हेही वाचा – Smriti Irani On Sanatan Dharma Defamation : …तोपर्यंत धर्माला कोणीही आव्हान देऊ शकत नाही; स्मृती इराणी यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना प्रत्युत्तर )

आता, आता लोकसभेच्या आगामी निवडणुकीत झामुमो लहान नव्हे तर मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार असे त्यांच्या व्यवहारावरून दिसून येत आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने घवघवीत यश मिळवित ३० आमदार निवडून आणले होते. यास आधार मानले तर झामुमो लोकसभेच्या आठ जागांवर दावा ठोकण्याची तयारी करीत आहे. काँग्रेस पक्ष मागच्याप्रमाणे या निवडणुकीतही नऊ जागांवर आपला दावा सांगणार आहे. याशिवाय, डावे पक्ष चार आणि राजद किमान दोन जागांवर दावा करणार आहे. यात मुख्यमंत्री नितीशकुमार एक जागा लढणार आहेत. म्हणजे, जागा १४ आणि तयारी २४ जागांवर लढण्याची. यामुळे झारखंडमध्ये आयएनडीआयच्या घटक पक्षात ‘डॉग फाईट’ होणे नक्की आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.