A Raja Defames Sanatan Dharma : म्हणे, सनातन धर्म HIV अन् कुष्ठरोगासारखा; द्रमुकचे खासदार ए राजा यांच्याकडून सनातन धर्मावर खालच्या स्तरावर टीका

139
A Raja Defames Sanatan Dharma : म्हणे, सनातन धर्म HIV अन् कुष्ठरोगासारखा; द्रमुकचे खासदार ए राजा यांच्याकडून सनातन धर्मावर खालच्या स्तरावर टीका
A Raja Defames Sanatan Dharma : म्हणे, सनातन धर्म HIV अन् कुष्ठरोगासारखा; द्रमुकचे खासदार ए राजा यांच्याकडून सनातन धर्मावर खालच्या स्तरावर टीका

उदयनिधी स्टॅलिन यांच्या पाठोपाठ द्रमुकचे खासदार ए राजा यांनीही सनातन धर्मावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका केली आहे. (A Raja Defames Sanatan Dharma) उदयनिधी स्टालिन यांच्या विखारी वक्तव्याचे समर्थन करताना ए राजा यांनी सनातन धर्माची तुलना ‘एचआयव्ही’सारख्या आजाराशी केली आहे. ‘मी म्हणतो सनातन धर्माची तुलना ही सामाजिक कलंक असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना मलेरियाशी केली आहे. मात्र सनातन धर्माची तुलना ही एचआयव्ही आणि कुष्ठरोग यासारख्या सामाजिक घृणास्पद असलेल्या आजारांशी केली गेली पाहिजे’, असे खासदार ए राजा यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Indian Army : चीन-पाक सीमेवर हायटेक ड्रोन तैनात)

“खरेतर, सनातन धर्माकडे कुष्ठरोग आणि एचआयव्हीसारख्या आजारासारखे पाहिले पाहिजे. मी सनातन धर्मावर कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहे,” अशी गरळओक ए राजा यांनी केली आहे. “आम्ही सनातन धर्म संपवला म्हणून अमित शाह गृहमंत्री झाले. साई सुंदरराजनही यामुळे राज्यपाल झाले. अमित शाह यांची इच्छा असेल तर ते दिल्लीत कोणत्याही ठिकाणी खुली चर्चा करू शकतात. एक लाख लोकांना बोलावून चर्चा करा. कोण बरोबर हे जनता ठरवेल”, असे आव्हान त्यांनी अमित शाह याना दिले आहे. (A Raja Defames Sanatan Dharma)

‘सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. ६ सप्टेंबर या दिवशी उदयनिधी स्टॅलिन आणि त्यांचे समर्थन करणारे काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता द्रमुकच्याच आणखी एका खासदाराने सनातन धर्मावर टीका केली आहे.

द्रमुक पक्षाचा धर्मद्वेषी इतिहास 

द्रमुक पक्षाच्या स्थापनेचा इतिहासच धर्मविरोधी भूमिकेचा आहे. त्यामुळे द्रमुक नेते अनेक वर्षनुवर्षे सनातन धर्मावर विखारी टीका करत आले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला  तमिळनाडूतील ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांनी ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ (DMK) ची स्थापना केली. पेरियार यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून नेहमीच धर्मावर टीका केली. पेरियार यांनी ७ जून १९३१ रोजी ‘कुडियारसू’मध्ये लिहिले आहे की, ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य जाती, गरीब आणि कामगार वर्ग यांना जर समता आणि समाजवाद हवा असेल तर त्यांनी सर्वात आधी हिंदू धर्म नष्ट करणे आवश्यक आहे.” तसेच पेरियार यांनी रामायणासारख्या हिंदू काव्य ग्रंथावरही टीकात्मक लेख लिहिले होते. पेरियार यांच्यानंतरचे द्रमुक नेते करुणानिधी यांनीही धर्मावर मोठ्या प्रमाणात टीका केली. उदयनिधी स्टॅलिन हे त्याच करुणानिधी यांचे नातू आहेत. (A Raja Defames Sanatan Dharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.