Fraud Businessman : लुटीची खोटी तक्रार देणाऱ्या व्यापाऱ्याचा बनाव उघडकीस

लालबाग परिसरात सुपरमार्केट चालवणारा अजित पटेल या व्यापाऱ्याने थ्री बीएचकेचा एक फ्लॅट खरेदी केला होता.

145
Fraud : माजी राज्यसभा खासदार यांची एका कथित वकिलाकडून फसवणूक

३५ लाख रुपयांची लूट झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या एका व्यापाऱ्याचा बनाव पोलिसांनी उघडकीस आणून त्या व्यापाऱ्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजित पटेल (३५) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. लालबाग परिसरात सुपरमार्केट चालवणारा अजित पटेल या व्यापाऱ्याने थ्री बीएचकेचा एक फ्लॅट खरेदी केला होता. बुधवारी या फ्लॅटची बुकिंग रक्कम देण्याची शेवटची तारीख होती. मात्र, व्यापाऱ्याला रक्कम भरण्यासाठी वेळ वाढवून हवी होती, ती मात्र त्याला मिळत नव्हती.

काहीही करून सदरचा फ्लॅट हातातून गेला नाही पाहिजे यासाठी व्यापाऱ्याने शक्कल लढवली. बुधवारी दुपारी अजित पटेल हा आपल्या ड्रायव्हरसोबत माटुंगा पोलीस ठाण्यात आला व त्याने माटुंगा पूर्व नप्पू रोड, पिरोज इमारती जवळ एका मोटारसायकल वरून आलेल्या दोन इसमांनी त्याला धक्का देऊन त्याच्याजवळ असलेली ३५ लाख रोकड असलेली बॅग बळजबरीने खेचून पोबारा केला अशी तक्रार दाखल केली. लुटीची तक्रार येताच माटुंगा पोलिसांनी तात्काळ फिर्यादी अजित पटेल याला घेऊन घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी करून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. परंतु, एकंदर पाहणी वरून त्या ठिकाणी अशीच कुठलीच घटना घडली नसल्याचे दिसून येत होते. व्यापारी अजित पटेल मात्र आपल्या तक्रारीवर ठाम होते, ते पोलिसांना पुन्हा पुन्हा झालेल्या घटनेची माहिती देऊ लागले.

(हेही वाचा – Rain Alert : दहीहंडी आणि गणेशोत्सव खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी पावसाची स्थिती जाणून घ्या; हवामान खात्याने वर्तवले अंदाज)

अजित पटेल यांच्या बोलण्यात खोटारडेपणा असल्याचे पोलीस नजरेने हेरले व अजित पटेल आणि त्यांच्या सोबत असलेला त्यांचा ड्रायव्हर यांना वेगवेगळ्या खोलीत चौकशीसाठी आणले व त्याची वेगवेगळी चौकशी केली असता दोघांच्या बोलण्यात तफावत आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणाची कसून चौकशी केली असता आपले खोटे पकडले गेल्याचे व्यापारी पटेल यांच्या लक्षात आले व त्याने खोटी तक्रार केल्याची कबुली पोलिसांना दिली. बिल्डरला बुधवारी फ्लॅटची आगाऊ रक्कम द्यायची होती. परंतु, त्यांना वेळ वाढवुन हवा होता म्हणून त्यांनी लुटीचा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.