खरं तर मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली खरी. पण आता नवनवीन आव्हानांचा सामना करावा लागतोय. त्यापैकीच एक आव्हान म्हणजेच जागावाटप होय. इंडिया आघाडी समोर हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे अनेक महत्वपूर्ण जागाचा विचार केल्यानंतर सहजच लक्षात येते. पंजाबमध्ये इंडिया आघाडीत मोठी दरार पडलेली दिसून येत आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकमेकांना सोबत द्यायला स्पष्ट नकार दिला आहे.
२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी ‘I.N.D.I.A.’ नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत एकूण २६ पक्ष आहेत. यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) या पक्षांचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावर हे पक्ष एकत्र आले असले तरी पंजाबमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांचे प्रखर विरोधक आहेत. केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यास समहती दर्शवली आहे. पंजाबमध्ये मात्र राज्य पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांचा एकत्र लढण्यास नकार आहे. ही नाराजी आता पंजाब काँग्रेसमधील नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.
(हेही वाचा – Dahihandi In Mumbai : पहा, मुंबईतील दहीहंडी उत्सवाचा छायाचित्रमय थरार !)
पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वाने आप पक्षाशी युती करण्यास नापसंती व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब युवक काँग्रेसतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या बैठकीत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांनी आगामी लोकसभा निवडणूक आणि आप पक्षाशी युती करण्यासंदर्भात भाष्य केले. “पंजाबमधील काँग्रेसच्या नेत्यांना या नव्या पक्षातील नेत्यांचे तोंड पाहायचे नाही. इच्छा नसताना लग्न करून दिले जात असेल तर ते लग्न दोन्ही कुटुंबांसाठी डोकेदुखीचं कारण ठरतं. आमच्या पक्षातील नेत्यांना आप पक्षाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवायचे नाहीत,” असे प्रतापसिंग बाजवा म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तुलना अडॉल्फ हिटलरशी केली. या कार्यक्रमात बाजवा यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांच्याकडे पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या भावना वरिष्ठांना कळविल्या आहेत. तर मुख्यमंत्री मान यांनी देखील स्वतंत्र लढायला पसंती दर्शविली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community