Rain Return : पावसाची पुन्हा हजेरी, मुंबईकर झाले गारेगार

मागील काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना थोडाफार थंडावा निर्माण करत दिलासा दिला.

167
Rain Return : पावसाची पुन्हा हजेरी, मुंबईकर झाले गारेगार
Rain Return : पावसाची पुन्हा हजेरी, मुंबईकर झाले गारेगार

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गोकुळाष्टमीच्या सणानिमित्ताने पुन्हा एकदा हजेरी लावत गोपाळकाल्याच्या दिवशी जोरदार बरसत मुंबईसह इतर शहरांना भिजवून टाकले. मुंबईत सकाळपासून संततधार सुरुच राहिली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना थोडाफार थंडावा निर्माण करत दिलासा दिला. त्यामुळे पावसाच्या हजेरीमुळे मुंबईकरांना आता गारेगार वातावरण अनुभवता येणार आहे. दरम्यान, या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले असले तरी या साचलेल्या पाण्याचाही त्वरीत निचरा झाल्याने पावसाच्या हजेरीबाबत मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला.

मुंबईमध्ये गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नोंदवलेल्या नोंदीनुसार कुलाबा वेधशाळेमध्ये ४३.६ आणि सांताक्रुझ वेधशाळेने ९२.५ मि. मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शहर भागांमध्ये ५७.६३ मि. मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरात ७६.९४ मि. मी आणि पश्चिम उपनगरात ९०.५० मि. मी एवढा पाऊस पडला. सायंकाळी पावणे पाच वाजता ३ मीटरची समुद्राला भरती असल्याने या कमी उंचीच्या भरतीमुळे मुसळधार पावसाचा फटका काही भागांमध्ये पाणी साचल्याने झाला नाही.

ज्या भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडले होते तिथेही काही मिनिटांमध्ये पाण्याचा निचरा झाल्याने या पावसाचा तेवढासाठी परिणाम दिसून आला. मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग हा पाणी तुंबण्याची शक्यता लक्षात घेता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता, परंतु पाण्याचा निचरा झाल्याने तेथील वाहतूकही सुरळीत झाले होते. दिवसभरात झाडे उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून पडण्याच्या ११ घटना घडल्या. त्यामध्ये पूर्व उपनगरात चार आणि पश्चिम उपनगरात ७ घटनांचा सामावेश होता. शॉटसर्कीटच्या एकूण आठ घटना घडल्या असून पश्चिम उपनगरात चार आणि शहर व पूर्व उपनगरांत प्रत्येकी दोन घटनांचा समावेश आहे.

(हेही वाचा – OBC Reservation : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा डाव हाणून पाडणार; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून महापंचायत होणार !)

सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा पाऊस

शहर भाग

रावळी कँप : (९० मि. मी), वडाळा : (८३ मि. मी), दादर (८२ मि. मी), माटुंगा (८१ मि. मी), प्रभादेवी (७२ मि. मी) , हाजीअली (६७ मि. मी), गिरगाव (६२ मि. मी), परळ (६१ मि. मी), भायखळा (५९ मि. मी), वरळी (५७ मि. मी)

पूर्व उपनगरे

गोवंडी (१५० मि. मी), विक्रोळी (९६ मि. मी), कुर्ला (८४ मि. मी), चेंबूर (८१ मि. मी), भांडुप (८० मि. मी), कुर्ला (७६ मि. मी), मुलुंड गव्हाणपाडा (६० मि. मी), मुलुंड (५९ मि. मी), घाटकोपर (२९ मि.मी)

पश्चिम उपनगरे

मालवणी (११७ मि. मी), मरोळ (११५ मि. मी), अंधेरी पश्चिम (१०४ मि. मी), चिंचोली (१०३ मि. मी), अंधेरी पूर्व (१०१ मि. मी), गोरेगाव (९८ मि. मी), वांद्रे ( ९३ मि. मी), विलेपार्ले (९३ मि. मी), सांताक्रुझ (९२ मि. मी), बोरीवली (८९ मि. मी)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.