Dr. Manmohan Singh : जागतिक राजकारणात भारताची भूमिका योग्यच ; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले कौतुक

169
Dr. Manmohan Singh : जागतिक राजकारणात भारताची भूमिका योग्यच ; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले कौतुक

एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असताना दुसरीकडे (Dr. Manmohan Singh) माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागतिक नेतृत्वाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपली स्वायत्तता आणि आर्थिक संबंध जपत असताना नव्या जगाची घडी बसविण्याच्या दिशेने भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा शब्दांमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी भारताच्या जागतिक नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

२००८ साली जी-२०ची स्थापना झाली, त्यावेळी डॉ. सिंह (Dr. Manmohan Singh) देशाचे पंतप्रधान होते. २०१४ पर्यंत त्यांनीच या राष्ट्रगटात देशाचे प्रतिनिधित्व केले. या मुलाखतीत त्यांनी जी-२० अध्यक्षपदारून भारताची कामगिरी, शिखर परिषदेचे आयोजन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची भूमिका आदी मुद्दय़ांवर मनमोकळे भाष्य केले.

(हेही वाचा – Dahihandi : मुंबईत १०७ गोविंदा जखमी, १४ गोविंदा रुग्णालयात दाखल)

नेमकं काय म्हणाले डॉ. मनमोहन सिंह?

‘‘आपल्या हयातीमध्ये (Dr. Manmohan Singh) भारताकडे चक्राकार पद्धतीचे जी-२० अध्यक्षपद आले आणि शिखर परिषदेचे यजमानपद भारत करत असल्याचे बघायला मिळाले, याचे समाधान आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि पाश्चिमात्य देश-चीनमधील तणावामुळे जागतिक परिस्थिती बरीच बदलली आहे. अशा वेळी स्वातंत्र्यापासून टिकलेली शांतताप्रीय लोकशाही आणि वर्धमान अर्थव्यवस्थेमुळे देशाने जगात प्रचंड आदर कमावला आहे,’’ असे सिंग म्हणाले. जेव्हा दोन मोठय़ा देशांमध्ये संघर्ष होतो, तेव्हा इतरांवर कुणा एकाची बाजू घेण्याचे दडपण असते. सध्या भारताने आपले सार्वभौमत्व व आर्थिक हितसंबंध जोपासतानाच शांततेचे आवाहन करण्याची भारताची भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

चीनबरोबर ताणले गेलेले संबंध आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची जी-२० परिषदेतील अनुपस्थिती याबाबत विचारले असता (Dr. Manmohan Singh) मनमोहन सिंह म्हणाले, की गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे हाताळावेत यावर मी पंतप्रधानांना सल्ला देणे योग्य नाही. मात्र जिनपिंग जी-२० परिषदेला न येणे दुर्दैवी आहे. देशाच्या सीमा आणि स्वायत्ततेचे रक्षण करून तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान योग्य पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या (Dr. Manmohan Singh) रचनेमध्ये परराष्ट्र धोरण हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. जगातील भारताचे स्थान, हा देशांतर्गत राजकारणाचा मुद्दा निश्चितच आहे. मात्र मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र राजकारणाचा पक्ष किंवा व्यक्तिगत राजकारणासाठी वापर करण्यापासून आपण दूर राहिले पाहिजे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.