Maharashtra Rain : राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही आज मुसळधार पाऊस

125
Maharashtra Rain : राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना दिलासा

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी राज्यात सर्वत्र मोठ्या ब्रेकनंतर (Maharashtra Rain) मान्सूनचे पुनरागमन झाले. अशातच येत्या दोन, तीन दिवसांत सर्वत्र पावसाचा जोर वाढणार असल्याने हवामान विभागाकडून यलो अलर्टबरोबर ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

राज्यात मान्सून परतल्यामुळे शेतकरी आनंदात आहेत शिवाय आता सप्टेंबर महिन्यात पाऊस (Maharashtra Rain) पडला, तर राज्यातील धरणांमध्ये जलसाठी देखील चांगला होईल. यामुळे रब्बी हंगाम चांगला होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी पावसाबाबत व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Dr. Manmohan Singh : जागतिक राजकारणात भारताची भूमिका योग्यच ; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले कौतुक)

बंगालच्या उपसागरात झालेल्या चक्रवाताच्या परिस्थितीसोबत अरबी समुद्रावरून पश्चिमी वारे वाहू लागले आहे. यामुळे राज्यात (Maharashtra Rain) सर्वत्र मान्सून सक्रीय झाला आहे. रविवारपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. शुक्रवारी धुळे आणि जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.

कुठे पडणार मुसळधार पाऊस…

चक्रवाताच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रासह तेलंगणा, मध्य प्रदेश तसेच अरबी समुद्रावरून येणारे पश्चिमी वारे सक्रीय झाले आहे. यामुळे राज्यात (Maharashtra Rain) मान्सून सर्वत्र सक्रीय झाल्याचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम काश्यपी यांनी म्हटले आहे. पुणे घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यात पुढील ४८ तासांत मध्य ते मुसळधार पाऊस असणार आहे. सोलापूर आणि सांगली वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून जळगाव, धुळे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे.या भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह (Maharashtra Rain) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.