PMP Bus : धावत्या पीएमपी बसवर झाड कोसळून चालक जखमी, प्रवाशांची धावाधाव

96
PMP Bus : धावत्या पीएमपी बसवर झाड कोसळून चालक जखमी, प्रवाशांची धावाधाव

पुणे शहारात धावत्या पीएमपी बसवर (PMP Bus) झाड कोसळल्याची घटना गुरुवारी, 7 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून बसचालक किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMP Bus) अप्पर ते निगडी ही बस फर्ग्युसन रस्त्यावरून सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जात होती. दरम्यान, बस फर्ग्युसन कॉलेजजवळील थांब्यावर थांबली. या थांब्यावरून काही प्रवासी बसमध्ये चढले, मात्र बस निघत असताना फुटपाथजवळील गुलमोहराचे झाड अचानक बसवर कोसळले. झाडाचा बुंधा फुटपाथवर कोसळला, तर पुढील फांद्या बसच्या काचा आणि समोरच्या बाजूवर आदळल्या. अचानक झाड कोसळल्यामुळे बसचालक अप्पाराव जाधव यांनी तातडीने बस थांबवली. त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. या बसमधून 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. बसवर झाड आदळल्यामुळे त्यांनी घाबरून धावाधाव सुरू केली.

(हेही वाचा – Maharashtra Rain : राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांना दिलासा)

घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी (PMP Bus) धाव घेतली. या घटनेच माहिती अग्निशमन दलाला कळवताच त्यांनी येऊन बसवर कोसळलेलं झाड बाजूला केले. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पाठवण्यात आलं. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला (PMP Bus) दुखापत झाली नाही, मात्र अनपेक्षितपणे बसवर कोसळलेल्या या झाडामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.