Dhangar Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आरक्षण समितीच्या कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळला

'यळकोट-यळकोट जय मल्हार'च्या घोषणा

136
Dhangar Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आरक्षण समितीच्या कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळला

सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन (Dhangar Reservation) राज्यातील वातावरण प्रचंड तापलं आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण, सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे.

शंकर बंगाळे असे या धनगर आरक्षण (Dhangar Reservation) कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. आज म्हणजेच शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळी शंकर बंगाळे सोलापूरच्या विश्रामगृहावर विखे-पाटलांची भेट घेण्यासाठी गेले. आपल्याला विखे-पाटील यांच्याकडे धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शंकर बंगाळे यांना विखे-पाटलांना भेटून देण्याची परवानगी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठरल्याप्रमाणे शंकर बंगाळे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर विखे-पाटील हे निवेदन वाचत असताना शंकर बंगाळे याने खिशातून भंडाऱ्याने (Dhangar Reservation) भरलेला रुमाल काढला आणि तो सरळ विखे-पाटलांच्या डोक्यावर रिता केला. यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’च्या घोषणा दिल्या.

(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj : महाराजांची वाघनखं यावर्षीच मायभूमीत परतणार, सुधीर मुनगंटीवार लवकरच करणार लंडन वारी)

हा प्रकार बघताच राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकांनी (Dhangar Reservation) तातडीने शंकर बंगाळे याला पकडले. या सगळ्यांनी शंकर बंगाळे याला खाली पाडून थोडीफार मारहाण केली. यानंतर पोलिसांनी शंकर बंगाळे याला ताब्यात घेतले. शंकर बंगाळे याने यापूर्वीही असाच प्रकार केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.